कळंब तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची कळंब – उस्मानाबाद चे आ. पाटील यांनी केली पाहणी. सरसकट पंचनामे करण्याचे दिले अधिकाऱ्यांना आदेश!
परवेज मुल्ला
उस्मानाबाद :जिल्ह्यामध्ये
मागील काही दिवसांपासून चालू असलेल्या पावसामुळे कळंब तालुक्यात व परिसरात शेतीचे, पिकांचे तसेच घरांचे नुकसान झालं आहे.येरमाळा, पानगाव, दुधाळवाडी, संजीतपूर ता.कळंब गावास कळंब – उस्मानाबाद चे आ. कैलास पाटील यांनी भेट देत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली व लोकांना आधार दिला.उपस्थित असलेल्या अधिकारी वर्गाला तात्काळ सर्व क्षेत्राचे सरसकट पंचनामे करण्याचे तसेच नुकसान भरपाई वेळेतच कशी मिळेल याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश दिले.
यावेळी तालुकाप्रमुख शिवाजी कापसे, शहरप्रमुख प्रदिप बप्पा मेटे, गणप्रमुख विलास पवार, उपविभागीय अधिकारी श्रीमती अहिल्या गोळे-गाठाळ, तहसीलदार श्रीमती मंजुषा लटपटे, तालुका कृषी अधिकारी जाधव, मंडळ अधिकारी मटके, विलास पवार, वसंत पवार, बाबासाहेब बारकुल, शिवाजी बेडके, उत्रेश्वर पवार, रमेश चव्हाण, राजेंद्र वाघमारे, आगतराव बेडके, श्रीमंत बेडके, कल्याण चव्हाण, अच्युतराव पवार, सुब्राव जाधव, भीमराव रसाळ, बालाजी लाटे, तुकाराम लाटे, नितीन लाटे, हनुमंत लाटे, अनिल दुधाळ तसेच कृषी सहाय्यक, तलाठी, शेतकरी, गावकरी आदी उपस्थित होते.