जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंत्र्यांच्या जनता दरबाराचं अधिकृत वेळापत्रक ट्विटरवर जाहीर!

Spread the love

मुंबई :- जनतेचे प्रलंबित असलेले प्रश्न तत्काळ सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या मंत्र्यांना नवा आदेश जारी केला आहे. त्यानुसार आता राष्ट्रवादीचे मंत्री मुंबईतील पक्षाच्या प्रदेश कार्यालयात  जनता दरबार घेणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या चार महिन्यांपासून राष्ट्रवादीच्या नेत्यांचा जनता दरबार बंद होता. मात्र, आता सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी राष्ट्रवादीचे मंत्री जनता दरबार सुरू करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंत्र्यांच्या जनता दरबाराचं अधिकृत वेळापत्रक ट्विटरवर जाहीर करण्यात आलं आहे. “राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनुसार राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी प्रदेश कार्यालयात कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी ३१ ऑगस्टपासून वेळ देण्याचं निश्चित करण्यात आलं आहे.” अशी माहिती राष्ट्रवादीकडून देण्यात आली आहे.

राष्ट्रवादीकडून जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार पक्षाच्या प्रदेश कार्यालयात सोमवारी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड दुपारी २ ते ४ या वेळेत जनता दरबार घेतील. तर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक सायंकाळी ४ ते ६ या वेळेत जनता दरबार घेतील. मंगळवारी अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ  सकाळी १० ते १२, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे दुपारी २ ते ४ तर सहकार मंत्री बाळासाहेब पाटील सायंकाळी ४ ते ६ या वेळेत जनता दरबार घेतील.

बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपेहे १० ते १२, मंत्री दत्तात्रय भरणे दुपारी २ ते ४ तर मंत्री प्राजक्त तनपुरे संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत जनता दरबार घेतील. गुरुवारी ग्रामिकास मंत्री हसन मुश्रीफ सकाळी १० ते १२, दुपारी २ ते ४ या वेळेत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे तर मंत्री दिलीप वळसे पाटील संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत जनता दरबार घेतील. शुक्रवारी गृहमंत्री अनिल देशमुख  सकाळी १० ते १२, मंत्री आदिती तटकरे दुपारी २ ते ४ आणि मंत्री संजय बनसोडे संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत दरबार घेणार आहेत.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.