इंदापुर तालुक्यात दूध आंदोलनाचा एल्गार: भाजपच्या वतीने तालुक्यात 9 ठिकाणी आंदोलन!

Spread the love

इंदापुर | आज दि 1 ऑगस्ट 2020 रोजी कळस मौजे तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे महाआघाडी सरकारच्या विरोधामध्ये राज्य परिषद सदस्य बाबासाहेब चवरे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य माऊली काका चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली यलगार दूध बंद आंदोलन मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहून करण्यात आले.

महाआघाडी सरकारच्या विरोधामध्ये जोरजोरात घोषणा देण्यात आल्या. शेतकऱ्यांना दुधाला भाव मिळावा यासाठी भाजप च्या वतीने हे आंदोलन करण्यात आले, मा. मंत्री मा हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापुर तालुक्यात 9 ठिकाणी हे आंदोलन पार पाडण्यात आले. या वेळेस भारतीय जनता पार्टी ज्येष्ठ कार्यकर्ते व पदाधिकारी यांची भाषणे झाली, राज्य परिषद सदस्य बाबासाहेब चवरे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य माऊली काका चवरे तसेच जिल्हा परिषद पंचायत समिती आघाडीचे प्रदेश चिटणीस युवराज मस्के, किसान मोर्चा चे रमेश खरतोडे,पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे उपाध्यक्ष गजानन वाकसे तसेच संतोष कांबळे उपाध्यक्ष भाजपा अनुसूचित जाती मोर्चा पुणे जिल्हा बाळासाहेब पानसरे रणजीत पाटील विलास खरतोडे बाळासाहेब भांडवलकर त्यांनी आपल्या भाषणातून सरकारच्या विरोधामध्ये रोष व्यक्त केला. सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला समारोप बाळासाहेब पानसरे सरचिटणीस भाजपा इंदापूर तालुका यांनी केला. याप्रसंगी नवनाथ खरतोडे, सतीश भोसले, शहाजीराव कांबळे, राहुल कांबळे, हनुमंत निंबाळकर, आबासाहेब थोरात असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.