IT रिटर्न (रिटर्न फाइल) भरताना कशाप्रकारे कराल ई-व्हेरिफिकेशन? वाचा सविस्तर

Spread the love

नवी दिल्ली | आयकर विवरणपत्र अर्थात रिटर्न फाइल करणं सुलभ तसंच एकसंध व्हावं, हे काम विनाअडथळा पूर्ण व्हावं यासाठी आयकर विभागाने ई-व्हेरिफिकेशन सुरू केलं आहे. यामध्ये तुम्ही विविध प्रकारे ई-व्हेरिफिकेशन करू शकता. आयकर रिटर्न भरताना तुम्हाला तीन टप्प्यांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण करावी लागते. यामध्ये सर्वात आधी तुमच्या आयकर फॉर्ममध्ये तुम्हाला सर्व माहिती भरायची आहे. त्यानंतर ही माहिती ई -व्हेरिफाय करून घ्यायची आहे. ही माहिती ई-व्हेरिफाय केल्यानंतर आयकर विभागाकडे शेवटच्या टप्प्यासाठी म्हणजेच पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जाते. यानंतर आयकर विभाग त्यावर कार्यवाही करते. ई-व्हेरिफिकेशन खूप महत्त्वाचं तुम्ही चार प्रकारे हे काम पूर्ण करू शकता.

ई-व्हेरिफिकेशन चार प्रकारे करता येते. यामध्ये नेट बँकिंग बँक अकाउंट क्रमांक वापरून आधार ओटीपी वरून आणि डिमॅट अकाउंट द्वारे देखील तुम्ही ई-व्हेरिफिकेशन करू शकता.

*ई-व्हेरिफिकेशन या पद्धतीने करा.*

1. करदाता आयकर विभागाच्या www.incometaxin diaefiling.gov.in या वेबसाइटवर जाऊन ईव्हीसी तयार करू शकतो.

2. त्यानंतर ई-व्हेरिफाय रिटर्न लिंकवर क्लिक करा.

3. यानंतर तुमचा पॅनकार्ड क्रमांक असेसमेंट इयर आणि आयटीआर फायलिंगवेळी मिळालेला ॲक्नॉलेजमेंट क्रमांक टाका.  तुम्ही आयटीआर पोर्टलवर लॉग इन करून पॅनकार्ड क्रमांक आणि पासवर्ड टाकून तुमचा ॲक्नॉलेजमेंट क्रमांक मिळवू शकता.

4. यामध्ये तुम्ही अपलोड केलेला फॉर्म उघडल्यानंतर ई-व्हेरिफाय या लिंकवर क्लिक करा.

5. ई-व्हेरिफिकेशन कोड तयार करण्यासाठी तुम्हाला चार पर्याय दिसतील.

6. यामध्ये तुम्ही कोणतीही पद्धत वापरून ई-व्हेरिफिकेशन पूर्ण करू शकता. त्यानंतर सबमिट या पर्यायावर क्लिक केल्यास तुमचा आयकर रिटर्न  यशस्वीपणे फाईल होईल. यावेळी स्क्रीनवर तुम्हाला ‘return successfully e-verified’ असा मेसेज देखील येईल.

यामध्ये चारही पद्धती खूप सोप्या असून कोणत्याही पद्धतीने ई-व्हेरिफिकेशन करू शकता. ई-व्हेरिफिकेशन करण्यासाठी करदाता आयकर विभागाच्या www.incometaxin diaefiling.gov.in या वेबसाइटवर जाऊन लॉगइन करू शकतो. यामध्ये तुमच्या मोबाईलवर किंवा इमेलवर ओटीपी येतो. हा ओटीपी वापरून तुम्ही ई-व्हेरिफिकेशन करू शकता.

त्याचबरोबर आधार क्रमांक वापरून तुमच्या ओटीपी क्रमांकाच्या मदतीने देखील ई-व्हेरिफिकेशन करू शकता.त्याचबरोबर डीमॅट क्रमांक वापरून देखील ई-व्हेरिफिकेशन करू शकता. यामध्ये मोबाईल क्रमांक, DP ID आणि क्लाईंट आयडी, इमेल आयडी वापरून इ व्हेरिफिकेशन करू शकता. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर ई-व्हेरिफिकेशन कोड येतो. तुमच्या बँक अकाऊंटवरून व्हेरिफिकेशन करण्यासाठी तुम्हाला बँकेचे नाव, IFSC कोड आणि मोबाईला क्रमांक वापरून व्हेरिफिकेशन करू शकता.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.