कोरोनाच्या काळात एका वर्षात इंदापूर तालुक्यात शिवशंभु ट्रस्टच्या साथीने शुभम निंबाळकर यांनी रक्तदानाचा रचला इतिहास!
बेलवाडी येथे रक्तदान शिबिर…
कोरोना संकटात इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून तालुकाध्यक्ष ॲड शुभम निंबाळकर यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी कोरोना काळात 4 वेळा रक्तदान शिबिर आयोजित करून 1000 पेक्षा अधिक बाटल्या संकलित केल्या यामुळे ही रक्तदान चळवळ उभी करून समाजासाठी भरीव काम केले आहे असे गौरोद्गार पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी काढले.
देशात वाढत्या कोरोनामुळे निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या आवाहनानुसार इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने बेलवाडी येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्रदिप गारटकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी गारटकर बोलत होते. यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे सुपुत्र श्रीराज भरणे , नेचर डिलाईट डेअरीचे अध्यक्ष अर्जुन देसाई, छत्रपती सहकारी साखर कारखाना माजी उपाध्यक्ष कांतीलाल जामदार, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष ॲड शुभम निंबाळकर, बेलवाडी चे सरपंच माणिक जामदार, उपसरपंच नानासो पवार, थोरातवाडीचे माजी सरपंच केशव नगरे, रामभाऊ यादव, दत्तात्रय घाडगे,प्रकाश खैरे, बाळासाहेब गायकवाड, दादा गोरे, करण काटे, दादा यादव, गणेश माने, अभी यादव, सागर पवार, माऊली काटे, सुमित जगताप, संकेत पवार, धीरज निंबाळकर, जावेद मुलाणी, सागर चव्हाण आदी उपस्थित होते.
या शिबिरामध्ये 176 जणांनी रक्तदान केले. शिबिराचे आयोजन इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष ॲड शुभम निंबाळकर यांनी केले होते. या शिबिरास श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टने सहकार्य केले.