युवासेनाच्या वतीने हिंदू-मुस्लिम एकता रक्षाबंधन सोहळा संपन्न!

Spread the love

उस्मानाबाद | मौजे शे धानोरा येथे युवासेनाच्या वतीने रक्षाबंधन सोहळा आयोजित करण्यात आला भावा बहिणीचे अतुट नात्यांचा उत्सव म्हणजे रक्षाबंधन हा हिंदू धर्मात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो याचं निमित्ताने युवासेना च्या वतीने हिंदू मुस्लिम एकता रक्षाबंधन सोहळा घेण्यात आला गावातील मुस्लिम समाज बांधवांना राखी बांधून मोठ्या उत्साहात सोहळा संपन्न झाला.

यासाठी गावातील सर्वधर्मीय समाजबांधवांनी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमदादा राजेनिंबाळकर,आमदार कैलास दादा पाटील युवासेना संपर्कप्रमुख नितीन दादा लांडगे, शिवसेना शहरप्रमुख प्रदिप मेटे, युवासेना उपजिल्हाप्रमुख सागर बाराते, विधानसभा प्रमुख सचिन काळे, युवा सेना तालुकाप्रमुख मनोहर धोंगडे, शिवसेना उपशहर प्रमुख मंदार मुळीक, युवा सेना शहर प्रमुख गोविंद चौधरी, तसेच गावातील शाखाप्रमुख सुनिल शेळके, धर्मराज शेळके,उपसरपंच सौ शिला इंगळे,ग्रा प सदस्य सौ विद्या बाराते,ग्रा प सदस्य सौ जयश्री शेळके, सुनिल पुरेकर,शाम शिंदे, शहाजी शेळके, तुराबद्दिन सय्यद,विश्वा लोकरे समाधान शेळके, रूषी पुरेकर, गजानन पुरेकर, भालचंद्र सव्वाशे,राजा कसबे, तसेच गावातील विद्यार्थी,नागरीक उपस्थित होते

Google Ad

3 thoughts on “युवासेनाच्या वतीने हिंदू-मुस्लिम एकता रक्षाबंधन सोहळा संपन्न!

Leave a Reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.