क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी; अखेर 19 सप्टेंबर पासून IPL होणार चालू, मुंबई विरुद्ध चेन्नई पहिला सामना!
दुबई | कोरोना व्हायरस महामारीमुळे यंदाचे आयपीएल यूएईमध्ये 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. गेली अनेक दिवसांपासून क्रिकेट चाहते आयपीएलच्या वेळापत्रकाची वाट पाहत होते. आज अखेर वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, 19 सप्टेंबरला पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स या संघांमध्ये भारतीय वेळेनुसार रात्री 7.30 वाजता होणार आहे. सध्या केवळ लीगमधील सामन्यांचीच घोषणा करण्यात आली असून, प्लेऑफच्या तारखा नंतर जाहीर केल्या जाणार आहेत. आयपीएलचे 13वे सत्र 19 सप्टेंबरला सुरू होणार असून, अंतिम सामना 10 नोव्हेंबरला खेळला जाणार आहे.
Indian Premier League (IPL) Governing Council releases the complete fixtures for the league stage of the Dream11 IPL 2020 to be held in UAE. https://t.co/7FRfkI6Cbg pic.twitter.com/iM4HTBpMNo
— ANI (@ANI) September 6, 2020
लीगच्या सामन्यांमध्ये 10 वेळा दिवसाला दोन सामने आहेत. बहुतांश सामने हे भारतीय वेळेनुसार रात्री 7.30 ला सुरू होतील. ज्या दिवशी दोन सामने असतील त्यातील पहिला सामना हा दुपारी 3.30 वाजता खेळला जाईल. यंदाच्या आयपीएलवर कोरोनाचे सावट आहे. यूएईला रवाना झालेल्या खेळाडू व सपोर्ट स्टाफला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. चेन्नई सुपर किंग्समधील एका गोलंदाजासह 13 सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती. याशिवाय सुरेश रैना आणि हरभजन सिंह या प्रमुख खेळाडूंनी देखील माघार घेतली आहे. दरम्यान, एका रिपोर्टनुसार, आयपीएलसाठी सुनील गावसकर, लक्ष्मण शिवरामाकृष्णन, मुरली कार्तिक, दीप दासगुप्ता, अंजुम चोपडा, रोहन गावसकर आणि हर्षा भोगले हे कॉमेंटेर्स असतील.