राज्यात ‘या’ 20 आजारांवर मोफत उपचार, पैसे घेतले तर रुग्णालयांना पाचपट दंड; आरोग्यमंत्री राजेश टोपे!
मुंबई | श्वसनासंदर्भातील आजारांसाठी मोफत उपचार करण्याच्या सूचना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून देण्यात आले आहेत. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेबाबत सरकारने विशेष आदेश जारी केले आहेत. राज्यात कोरोनाचं संकट आहे. त्यातच आता गणपतीच्या पार्श्वभूमीवर तसंच कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बैठक बोलावली होती. यावेळी आरोग्यमंत्री म्हणाले, महात्महा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेबाबत सरकारकडून विशेष आदेश जारी करण्यात आले आहेत. यामध्ये श्वसनासंदर्भातील 20 आजारांसाठी मोफत उपचार करावेत. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतील रूग्णालयांनी हे उपचार मोफत करावे.
मात्र जर या उपचारांसाठी पैसे घेतले तर पाचपट दंड लावण्याचा त्याचप्रमाणे परवाना रद्द करण्याचा अधिकार जिल्ह्याधिकाऱ्यांना देण्यात आला असल्याचंही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत सार्वजनिक गणपती, मिरवणुका यांच्याबाबत सूचना देण्यात आल्यात. त्याचप्रमाणे कोरोनाविरोधातील लढा आणि अडचणी यावरही चर्चा झाल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.