पुणे शहराच्या कॅम्प परिसरातील फॅशन स्ट्रीटवर रात्री 11 वाजताच्या सुमारास भीषण आग, कपड्यांची दुकानं जळून खाक!
पुणे | पुणे शहरातील कॅम्प परिसरात असलेल्या फॅशन स्ट्रीटमध्ये रात्री 11 वाजताच्या सुमारास भीषण आग लागली होती. फॅशन स्ट्रीटमध्ये मोठ्या संख्येने कपड्यांची दुकाने आहेत, त्यामुळे या परिसरातील आग काही क्षणांत पसरली. आगीच्या ज्वाळा उसळलेल्या पाहायला मिळत होत्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी अखेर या आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. सुदैवाने पुण्यातील फॅशन स्ट्रीट मार्केटमध्ये लागलेली भीषण आग विझवून घरी जात असताना एका कर्तव्यदक्ष अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू झाला आहे. प्रकाश हसबे असे मृत्यू झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. ते पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अग्निशमन दलाचे प्रमुख होते.
पुण्याच्या कॅम्प परिसरात असणाऱ्या फॅशन स्ट्रीट मार्केटमध्ये रात्रीच्या सुमारास भीषण आग झाली. ही आग मध्यरात्री 1 च्या सुमारास पूर्णपणे आटोक्यात आली. त्यानंतर कुलिंग ऑपरेशन झाल्यानंतर प्रकाश हसबे हे घरी जाण्यास निघाले. पहाटे घरी जात असताना येरवाड्याजवळ त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
पुण्याच्या कॅम्प परिसरात असणाऱ्या फॅशन स्ट्रीट मार्केटमध्ये काल रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली होती. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 16 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तब्बल तीन तासांनी ही आग आटोक्यात आली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र यात फॅशन स्ट्रीट मार्केटमधील तब्बल 800 दुकानं आगीच्या कचाट्यात सापडली आहे. तसेच या आगीमुळे व्यापारांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे.
कोणतीही जीवितहानी नाही
फॅशन स्ट्रीटचा भाग अत्यंत अरुंद रस्त्यांचा असल्याने अग्निशमन दलाला ही आग विझवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. या दुर्घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, फॅशन स्ट्रीटचा परिसरात कपड्यांची अनेक दुकानं, गोदाम असल्याने त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान ही आग नेमकी कशी लागली? किती वाजता लागली? याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.