F1 आणि F12 कॉम्प्युटरच्या बटनांची माहीत नसलेली जादू; नक्की जाणून घ्या! - MahaMetroNews Best News Website in Pune

F1 आणि F12 कॉम्प्युटरच्या बटनांची माहीत नसलेली जादू; नक्की जाणून घ्या!

Spread the love

आपल्या हे मान्य करावे लागेल?

कॉम्प्युटर ने आपले जीवन सोपे केले आहे. या यंत्राचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे की-बोर्ड, ज्याद्वारे आपण हवं ते लिहू शकतो, करू शकतो.  पण की-बोर्ड हा काय फक्त लिहिण्याच्याच कामाचा आहे का …? तर नाही.

की-बोर्ड द्वारे आपण अनेक कामे हाताळू शकतो. तुम्ही बघितलं असेल या की-बोर्डवर F1 ते F12 अशी१२ बटणे असतात ज्यांना Functional Keys म्हणतात, पण आपल्याला या सर्व बटणांची जादू आपणांस माहितीये का…? कदाचित नाही…
म्हणूनच आज आम्ही आपल्याला या १२ बटनांची जादू काय आहे हे सांगणार आहोत.

1. F1 – ही नेहमी हेल्प-की म्हणून वापरली जाते, जेव्हा आपण कम्प्युटर सुरू करतो, तेव्हा आपण ही की दाबल्यानंतर, आपण थेट कम्प्युटरच्या सेटअपमध्ये पोहचतो. जिथे आपण सेटिंग्ज तपासू शकतो तसेच हवे असल्यास त्या सेटिंग्समध्ये बदल करू शकतो.
2. F2 – ही की विंडोज ऑपरेटिंग सिस्टममध्ये फाईलचे नाव बदलण्यासाठी वापरली जाते. तसेच मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये आपण या F-12 की ने त्या फाईलचा प्रिंट प्रीव्ह्यू पाहू शकता.
3. F3 – विंडोजमध्ये या की चा वापर करून आपण सर्च बॉक्स उघडू शकतो, ज्यामुळे कुठलीही फाईल अथवा फोल्डर आपण सर्च करू शकतो. या व्यतिरिक्त MS-DOS मध्ये ही की प्रेस केल्याने आधी दिलेली कमांड परत टाईप होते.
4. F4 –  माइक्रोसॉफ्ट वर्डमध्ये काम करत असताना ही की प्रेस केल्याने आधी केलेलं काम रिपीट होत, जसे एखादा शब्द पहिले टाईप केलेला असेल तो परत टाईप होईल, तसेच जर एखादा शब्द बोल्ड किंवा अंडरलाईन केला असेल तर तो परत होऊन जाईल.
5. F5 – या की चा उपयोग आपल्या सर्वांनाच माहित आहे, F-5 या की चा वापर मुख्यकरून कम्प्युटर रिफ्रेश करण्याकरिता केल्या जातो. याव्यतिरिक्त या की ला पावरपॉईंटमध्ये प्रेस केल्यास स्लाईड शो सुरु होतो.
6. F6 – ही की प्रेस केल्याने विंडोजमध्ये ओपन असलेल्या फोल्डर्सचे कन्टेन्ट दिसतात तसेच, मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये ओपन असलेले वेगवेगळे डॉक्युमेंट्स एक-एक करून बघण्यासाठी Control+Shift+F6 यांचा उपयोग केला जातो. याव्यतिरिक्त काही लॅपटॉप्समध्ये स्पीकरचा आवाज कमी करण्यासाठी देखील या की चा उपयोग होतो.
7. F7 – मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये या की  ला प्रेस केल्यावर आपण जे काही लिहितो त्याचं स्पेलिंग तसेच व्याकरण तपासलं जातं. Shift + F7 प्रेस केल्याने हायलायटेड केलेल्या शब्दाची शब्दकोश तपासणी केली जाते. याव्यतिरिक्त काही लॅपटॉप्समध्ये स्पीकरचा आवाज वाढविण्यासाठीही या की चा उपयोग होतो.
8. F8 – मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये टेक्स्ट ला सिलेक्ट करण्याकरिता या की चा उपयोग केला जातो.
9. F9 – मायक्रोसॉफ्ट आउटलूकमध्ये ई-मेल सेंड किंवा रिसिव्ह करण्याकरिता या की चा वापर होतो. तर काही लॅपटॉप्समध्ये या की चा उपयोग करून स्क्रीनची ब्राईटनेस कमी करता येते. तसेच मायक्रोसॉफ्ट वर्डमधील डॉक्युमेंट्स रिफ्रेश करण्यासाठीही या की चा वापर होतो.
10. F10 – कुठल्याही  सॉफ्टवेअरमध्ये काम करत असताना या की ला प्रेस केल्याने मेन्यू ओपन होतो, तसेच Shift+F10 प्रेस केल्याने हे माउसच्या राईट क्लिकचं काम करत. तर काही लॅपटॉप्समध्ये या की चा उपयोग करून स्क्रीनची ब्राईटनेस वाढवता येते.
11. F11 – इंटरनेट ब्राउजर्समध्ये फुल स्क्रीन व्ह्यू करण्यासाठी या की चा उपयोग केला जातो.
12. F12 – मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये ही की प्रेस केल्याने Savs As चे ऑप्शन ओपन होते, तसेच Shift+F12 प्रेस केल्याने मायक्रोसॉफ्ट फाईल सेव्ह  होऊन जाते.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.
WhatsApp Group