खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्युपिटर हॉस्पिटलमधे लहान बच्चुंच्या हृदय शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन!
ठाणे | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब आणि संसदरत्न खासदार मा. डॉ. श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये आयोजित २-डी इको तपासणी व ह्रदय शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, ज्युपिटर हॉस्पिटल आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील ह्रदयाला छिद्र असलेल्या लहान मुलांची मोफत २-डी इको तपासणी आणि ह्रदय शस्त्रक्रिया या शिबिराच्या माध्यमातून मोफत करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात १५० आणि एकूण ६०० मुलांची शस्त्रक्रिया करण्याचा संकल्प या शिबिराच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
खासदार मा. डॉ. श्रीकांतजी शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. वाढदिवसाचे औचित्य साधून विधायक उपक्रम राबवण्याचा आदर्श मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी घालून दिला आहे. आज आयोजित करण्यात आलेले हे शिबिर त्या विधायक विचाराचाच एक भाग असून यामुळे गरजूंना आवश्यक ती सुविधा उपलब्ध होईल, याचा आनंद आहे, अशी भावना यावेळी सर्वांनीच व्यक्त केली.
याप्रसंगी राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार मा. डॉ. श्रीकांतजी शिंदे साहेब, विधिमंडळातील आमचे सहकारी आमदार मा. शहाजीबापू पाटील, माजी खासदार मा. मिलिंदजी देवरा, शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख मा. नरेशजी म्हस्के, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मा. मंगेशजी चिवटे, व्याख्याते यशवंत गोसावी, यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, वैद्यकीय पथकातील डॉक्टर व कर्मचारी, नागरिक बंधू-भगिनी उपस्थित होते.