Diwali 2021 : दिवाळी 2021 लक्ष्मी पूजन विधी, या दिवशी काय करावे जाणून घ्या!

Spread the love

दिवाळीला लक्ष्मी पुजनाचे विशेष विधान आहे. या दिवशी संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळी शुभ मुहुर्तात देवी लक्ष्मी, विघ्नहर्ता भगवान गणेश आणि देवी सरस्वतीची पुजा आणि आराधना केली जाते. पुराणांच्या अनुसार कार्तिक अमावास्येच्या अंधाऱ्या रात्री महालक्ष्मी स्वयं भूलोकात येते आणि प्रत्येक घरात विचारण करते. या काळात जे घर प्रत्येक गोष्टीने स्वच्छ आणि प्रकाशवान असतं तिथे देवी अंश रूपात थांबते. या कारणामुळेच दिवाळीच्या निमित्ताने साफ-सफाई करून विधी पूर्वक पुजन केल्याने देवी महालक्ष्मीची विशेष कृपा असते. या दिवशी लक्ष्मी पुजनासोबत कुबेर पुजा ही केली जाते. पुजेच्या वेळी ह्या गोष्टीची काळजी घेणे गरजेचे आहे दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी पुजनाआधी घराची साफ-सफाई करावी. पूर्ण घरात वातावरणाची शुद्धी आणि पवित्रतेसाठी गंगाजलाचा शिडकाव करावा. घराच्या दारावर रांगोळी काढावी आणि दिवा लावावा. पुजा स्थळी एक चौरंग ठेवून त्यावर लाल कापड टाकून त्यावर लक्ष्मी- गणपतीची मूर्ती ठेवावी. चौरंगाजवळ पाण्याने भरलेला कलश ठेवावा. देवी लक्ष्मी आणि गणपतीच्या मूर्तीवर हळदी कुंकू लावून, दिवा लावून पाणी, मोळी, तांदूळ, फळ, गुळ, हळदी, गुलाल इत्यादी अर्पित करावा. देवी महालक्ष्मीची स्तुती करावी. या सोबतच देवी सरस्वती, काली, भगवान विष्णू आणि कुबेर देवाची ही पुजा विधान पूर्वक करावी. लक्ष्मी पूजनासाठी संपूर्ण कुटुंबाने एकत्र यावं.लक्ष्मी पूजा झाल्यावर तिजोरी, मशिनरी आणि व्यवासायिक उपकरणाची पूजा करावी. पुजा झाल्यानंतर गरजू लोकांना मिठाई आणि दक्षिणा द्यावी.

हिंदू धर्मात दिवाळीला खूप महत्त्व आहे. दिवाळीचा पवित्र सण धनत्रयोदशीपासून सुरू होतो. धनत्रयोदशीपासून भाऊबीजपर्यंत दिवाळी साजरी केली जाते. कार्तिक महिन्याच्या अमावस्येच्या दिवशी महालक्ष्मी पूजा केली जाते. या दिवशी भगवान गणेश आणि देवी लक्ष्मीची विधिवत पूजा  केली जाते. माता लक्ष्मीला धनांची देवी म्हटले जाते. माता लक्ष्मीच्या कृपेने भक्तांचे सर्व दु:ख दूर होऊन जीवन सुखी होते. चला जाणून घेऊया महालक्ष्मी पूजेची तिथी आणि शुभ मुहूर्त…

नरक चतुर्दशी…लक्ष्मी पूजन 

नरक चतुर्दशीचं मोठं महत्त्व आहे. पहाटे सूर्योदयापूर्वी उठून अभ्यंग स्नान केला जातो. यंदा नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन 4 नोव्हेंबरला आहे. सायंकाळी घरातील सगळे सदस्य एकत्र येऊन लक्ष्मी पूजन करतात.

– पहाटे सूर्योदयापूर्वी उठून अभ्यंग स्नान

लक्ष्मी कुबेर पूजनाचा मुहूर्त-

सकाळी 6 वाजून 50 मिनिटं ते 8 वाजून 10 मिनिटांपर्यंत.
सकाळी 11 ते दुपारी 3 वाजून 10 मिनिटांपर्यंत.
सायंकाळी 4 वाजून 40 मिनिटं ते रात्री 9 वाजून 5 मिनिटांपर्यंत.
मध्यरात्री 12 वाजून 30 मिनिटं ते 2.00 वाजेपर्यंत.
मध्यरात्री 3 वाजून 40 मिनिटं ते 6 वाजून 30 मिनिटांपर्यंत.
(स्वाती नक्षत्र- सकाळी 7 वाजून 44 मिनिटं ते 9 वाजून 8 मिनिटांपर्यंत. (5 नोव्हेंबर 2021)

दिवाळीला काय करावे काय नाही-
कार्तिक अमावस्येच्या दिवशी प्रातःकाळी शरीरावर तेलाची मालिश करुन नंतर अंघोळ करावी. असे मानले जाते की असे केल्याने धन हानी होत नाही.
दिवाळीच्या दिवशी व्यस्कर व लहान मुले सोडून इतर व्यक्तींनी भोजन करू नये. संध्याकाळी लक्ष्मी पुजनाच्या नंतर भोजन ग्रहण करावं. दिवाळीच्या दिवशी पूर्वजांचे पूजन करावे आणि त्यांना धूप व भोग अर्पित करावं. प्रदोष काळाच्या वेळी हातामध्ये उल्का धारण करुन पित्रांना मार्ग दाखवावा. उल्का म्हणजे दिवा लावून किंवा इतर माध्यमाने अग्नीचा प्रकाश दाखवून पित्रांना मार्ग दाखवा. असे केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती आणि मोक्ष प्राप्ती होते. दिवाळीच्या नि‍मित्ताने भजन, स्तुती, मंत्र म्हणत घरात उत्सव साजरा केला पाहिजे. असे सांगितले जाते की असे केल्याने घरात व्याप्त दरिद्रता दूर होते.
* उत्तर पूर्व दिशेकडे पूजेचे साहित्य ठेवा –
पूजा करताना तोंड उत्तरेकडे किंवा पूर्व दिशेकडे असावे. उत्तर दिशा ही धनाची दिशा आहे म्हणून हे स्थळ यक्ष साधना (कुबेर), लक्ष्मी-पूजन आणि गणेश पूजनासाठी आदर्श स्थळ आहे. लक्षात ठेवा, दिवाळीच्या पूजेसाठी असणाऱ्या मातीच्या लक्ष्मी-गणपतीची मूर्ती किंवा चित्र नवीन असावे. चांदीच्या मूर्तींना स्वच्छ करून उजळवून परत पूजेसाठी वापरण्यात घेता येतं. पूजेचे घट आणि इतर पूजेचे साहित्य जसे साळीच्या लाह्या, बत्तासे, शेंदूर, गंगाजल, अक्षता, रोली, मोली, फळे, मिठाई, पान-सुपारी, वेलची इत्यादी उत्तर-पूर्वी कडेच ठेवणं शुभ ठरतं.
* लाल रंग हे धनाची देवी लक्ष्मीला आवडतं –
देवी लक्ष्मीला लाल रंग खूप प्रिय आहे. लाल रंग हे वास्तू मध्ये देखील सामर्थ्य आणि पराक्रमाचे प्रतीक मानले आहेत, म्हणून देवी आईला अर्पण केले जाणारे कपडे, शृंगाराच्या वस्तू आणि फुले शक्यतो लाल रंगाचे असावे. देवघराच्या दारावर शेंदूर किंवा कुंकुाने स्वस्तिक बनविल्याने नकारात्मक शक्ती घरात येत नाही.
* शंखाच्या आवाजाने देवता प्रसन्न होतात –
वास्तुशास्त्रानुसार, शंखाचा आणि घंटाळीचा आवाज केल्याने देवी आणि देव प्रसन्न होतात आणि सभोवतालीचे वातावरण शुद्ध आणि पावित्र्य होऊन मनात आणि मेंदूत सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. दिवाळीच्या पूजनात श्रीयंत्र, कवडी आणि गोमती चक्राची पूजा केल्याने सौख्य -समृद्धी आणि भरभराट याना आमंत्रण देते.
Google Ad

9 thoughts on “Diwali 2021 : दिवाळी 2021 लक्ष्मी पूजन विधी, या दिवशी काय करावे जाणून घ्या!

  1. Hi, i believe that i saw you visited my weblog thus
    i got here to go back the prefer?.I am trying to in finding things to
    improve my site!I guess its ok to make use of some of your concepts!!

Leave a Reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.