इंदापूर तालुक्यातील सामान्य शेतकरी ते बेधडक राज्यमंत्री; दत्ता मामांची यशोगाथा!
कारखान्याचे संचालक ते राज्यमंत्री…!
सर्वसाधारण शेतकरी कुंटूबातील सर्वसामान्यांचे नेतृत्व दत्तात्रयजी भरणे साहेबांच्या कुटुंबाला कोणत्याही प्रकारचा राजकीय वारसा नसतांननाही निष्ठावान कार्यकर्तापासून सामाजिक कामांना सुरवात करणारे दत्तात्रय ( मामा ) भरणे साहेब पक्षनिष्ठा, पारदर्शक कारभार व विकासकामे खेचून आणण्याची धमक असल्याने श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक झालेत तिथून खऱ्याअर्थाने राजकीय प्रवासाला सुरवात झाली संचालक पदापासून राजकीय घोडदोड सुरु झाली तर राज्याच्या प्रमुख खात्याचे राज्यमंत्री पदापर्यंत झेप घेतली.
इंदापूर मतदारसंघातून आमदारकीची माळ अंन सोबत मिळाले ते मंत्रिपद माननीय दत्तात्रय ( मामा ) भरणे साहेब शेतकरी कुंटूबातील साधे व्यक्तीमत्व म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत.कुंटूबाला राजकारणातील घराणेशाहीचा वारसा नाही. केवळ पक्षनिष्ठा व विकासकामांच्या जोरावर आज मंत्रीपदापर्यंत मजल मारली आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे कट्टर समर्थक व विश्वासू आमदार म्हणून त्यांची राज्यामध्ये ओळख आहे.
१९९२ साली वयाच्या २२ व्या वर्षी भवानीनगरमधील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालकपदापासून त्यांची सुरवात झाली. १९९६ साली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालकपदी काम करण्याची संधी मिळाली. संचालक पदाच्या संधीचे सोने करुन शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्न मार्गी लावले. २००१ साली जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष. पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य व अध्यक्ष, इंदापूर तालुक्याचे आमदार होण्याचा माननीय दत्तात्रय ( मामा )भरणे साहेब यांना मिळाला.
इंदापूर तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा विकासनिधी आणून विकासकामांच्या जोरावर माननीय दत्तात्रय ( मामा )भरणे साहेब यांनी २०१४ ची विधानसभा निवडणूक सहज जिंकली.पाच वर्षामध्ये विराेधी पक्षाचा आमदार असतानाही जिल्हामध्ये सर्वाधिक निधी खेचून आणून तालुक्याचा विकास केला. याच काळामध्ये सत्ताधारी भाजपने अनेक आमिष दाखवून पक्षामध्ये घेण्यासाठी प्रयत्न केले. मात्र आदरणीय अजित दादा पवार साहेबांचे निष्ठावंत असल्याने जुलमी भाजप मध्ये गेले नाहीत आणि पवार कुटूंबियांना सोडण्याचा विचार हि मनात येणार नाही हे स्पष्ट केले.
सार्वजनिक बांधकाम, मृदा व जलसंधारण, वने, पशुसंवर्धन, दुद्धव्यवसाय विकास व मत्सव्यवसाय, सामान्य प्रशासन इतक्या माहितीच्या खारुताच्या राज्यमंत्रीपदी महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळाले.राज्याचे सामान्य प्रशासन राज्यमंत्रीयांनी कोरोनाच्या काळात थेठ पोलीस आणि डॉक्टरांप्रमाणे काम केले. यांनी इंदापूर शहरात मैदानात भरणाऱ्या भाजी मंडईस भेट देऊन भाजी विक्रेते व ग्राहकांना कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासन सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले. इंदापूर बस स्थानक परिसरातील फळ विक्रते, मास्क वापरत नाहीत असे समजताच त्यांनी तात्काळ आपल्या गाडीतून शेकडो मास्क पाठवून देऊन सर्वाना मास्क वापरून स्वतः, आपले कुटुंब, तसेच नागरिकांचे रक्षण करण्याच्या सूचना दिल्या. मंत्री दत्तात्रयजी ( मामा ) भरणे यांच्या या कळकळीच्या आवाहनामुळे सर्वजण भारावून गेलेत.
सर्व जण सॅनिटायझर किंवा साबणाने हात धुतात का याची चौकशी केली. लॉकडाऊन वाढवायचा का? असा प्रश्न त्यांनी भाजी विक्रेत्यांना करून त्यांची मने व मत जाणून घेतली. त्यामुळेलोकशाहीत आपल्याला देखील सन्मान आहे अशी भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली. भरणे यांच्या या कृतीचे इंदापूरकरांनी स्वागत केले. कोरोना काळात फक्त मतदार संघापुरता नाही तर महाराष्ट्रातील सर्वच जिल्हा प्रशासनासोबत वेळोवेळो चर्चा मार्गदर्शन आणि सूचना देण्याचे अविरत काम सुरु आहे.
कोणत्याही परिस्थितीत कोरोनासाठी शासनाकडून निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशीही घोषणा त्यांनी केली. शासनाच्या निर्णयाबाबत विरोधक वारंवार विनाकारण गैरसमज पसरवत आहेत त्यांना त्यांनी चांगलेच फैलावर घेतले शेवटी राज्याचे मंत्री म्हणून नेतृत्व करत असतांना कठोर आणि सक्तीच्या भूमिका घेणे अपेक्षित असतात. चुकीच्या मुद्द्यावर तुमचे राजकारण खपवून घेतले जाणार नाही असा सज्जड दमच त्यांनी भरला.
केवळ आणि केवळ कष्टाच्या जोरावर मार्गक्रमण करणाऱ्या माननीय दत्तात्रयजी ( मामा ) भरणे साहेबांनी नेहमीच प्रत्येकाला आपलेसे केले आहे. फक्त आदरणीय अजितदादा पवार साहेबांचे जवळकीक म्हणून दत्तात्रय ( मामा ) भरणे साहेब संपूर्ण महाराष्ट्राची ओळख बनले आहेत त्यामुळेच त्यांचे चाहतेही भरपूर आहेत. मीही त्यांचा असाच छोटासा चाहता. म्हणून पुढील वाटचालीस दत्तात्रय ( मामा ) भरणे साहेबांना पुढील वाटचालीस महामेट्रो न्यूज कडून शुभेच्छा..