कार्यकर्त्यांच्या प्रेमाखातर नेता हाताची सलाईन काढून हजार!

Spread the love

इंदापूर | रेडणी ता. इंदापूर येथील श्री. हर्षवर्धन दादासो बरकडे व प्रशांत दादासो बरकडे यांनी दिवाळी भाऊबीजेच्या शुभमुहूर्तावर नव्याने सुरू केलेल्या ” प्रतीक ट्रेंडींग कंपनी” या होलसेल किराणा व स्टेशनरी व नवीन वस्तूच्या उदघाटन समारंभास राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी कार्यकर्त्यांच्या प्रेमाखातीर स्वतःला लावलेल्या हाताची सलाईन काढून कार्यक्रमाला उपस्थित लावली व नंतर घरी जाऊन पूर्ववत सलाईन लावून उपचार सुरू ठेवले. मागील 2 दिवसांमध्ये झालेल्या धावपलीमुळे राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांना थोडा थकवा जाणवत असल्यामुळे त्यांनी सलाईन लावली असल्याचे सांगितले.

यावेळी भरणे म्हणाले की आपल्या जवळच्या माणसासाठी थोडा त्रास झाला तरी हरकत नाही. मात्र मी आलो नसतो तर या माझ्या माणसांना खूप वाईट वाटले असते. माझा सर्वांना सोबत घेऊन जाण्यासाठीचा प्रयत्न कायम असतो. बरकडे कुटुंब हे कष्ट करणारे कुटुंब आहे आणि त्यांनी मोठ्या कष्टातून हे उभा केले आहे. तरूणांनी या बरकडे कुटुंबाचा आदर्श घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.