कोरोना लस; राज्यांकडे लशींचा तुटवडा, मग विकत लस खासगी हॉस्पिटल्सना कशीकाय उपलब्ध होते?

Spread the love

दिल्ली | दिल्ली शेजारच्या ग्रेटर नोएडामध्ये राहणारे प्रशांत गेल्या अनेक दिवसांपासून स्वतःसाठी, कुटुंबासाठी लसीकरणाचा स्लॉट बुक करण्याचा प्रयत्न करतायत. सरकारी हॉस्पिटल्स आणि लसीकरण केंद्रांमध्ये त्यांना स्लॉट मिळाला नाही. म्हणून मग शेवटी खासगी हॉस्पिटलमध्ये जाऊन लस घ्यायचं त्यांनी ठरवलं. सरकारी हॉस्पिटल्समध्ये पुढच्या अनेक दिवसांचे स्लॉट्स भरलेले असताना खासगी हॉस्पिटल्सचे त्याच दिवसाचे स्लॉट्स मिळतायत…ही बुचकळ्यात टाकणारी गोष्ट आहे.” पैसे देऊन लस घेण्यात आपल्याला अडचण नसली तरी खासगी हॉस्पिटल्स अवाजवी दर आकारत असल्याचं ते म्हणतात.

प्रशांत सांगतात, “प्रत्येक हॉस्पिटलचा वेगळा दर आहे. एका डोससाठी हजार रुपये आकारले जात आहेत. कुटुंबातल्या दोघांनी दोन डोस घेतले तर चार हजार रुपये द्यावी लागतील. पण मुळात लस इतकी महाग नाही.”कोविन अॅपवर नोएडा भागातल्या हॉस्पिटल्समधले स्लॉट्स शोधले. प्रशांत यांच्या म्हणण्यात तथ्य असल्याचं आम्हाला आढळलं. सरकारी हॉस्पिटल्समधले पुढच्या अनेक दिवसांचे स्लॉट्स बुक दिसत असले तरी खासगी हॉस्पिटल्समध्ये विशेषतः 18 ते 44 वयोगटालाही आरामात लस मिळत असल्याचं आम्हाला आढळलं. लशीचे दर 250 ते 1000 रुपयांपर्यंत आहेत. 

दिल्ली सरकारने घेतला आक्षेप..

दिल्लीमध्ये खासगी हॉस्पिटल्समध्ये लस आरामात मिळतेय. कोविन अॅपवर एकीकडे बहुतेक सरकारी हॉस्पिटल्समध्ये स्लॉट्स दिसत नसले तरी खासगी हॉस्पिटल्समध्ये 600 ते 1000 रुपये देऊन लस घेता येतेय.

याला केंद्र सरकारचं धोरण जबाबदार असल्याचं दिल्ली सरकारने म्हटलंय. आम आदमी पार्टीच्या आमदार आतिशी यांनी कोविन अॅपच्या दिल्लीच्या परिस्थितीचा फोटो पोस्ट करत ट्वीट केलंय, “भारत हा जगातला एकमेव देश असेल जिथे राज्य सरकारं जी लस फुकटात देतायत, त्यांच्याकडे ज्या लशीचा पुरवठा नाही पण खासगी हॉस्पिटल्सना भरमसाठ दराने विकण्यासाठी मात्र ती लस उपलब्ध आहे.”

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.