BREAKING NEWS; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे 8 दिवस लॉकडाऊनचे संकेत!

Spread the love

मुंबई | राज्यातील कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार लॉकडाऊन लागू करण्याच्या तयारीत आहे. याबाबतचा निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व विरोधी पक्षांची बैठक बोलावली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. आठ दिवस लॉकडाऊन ठेवू. त्यानंतर एक एक गोष्टी सोडू, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मात्र, तज्ज्ञांच्या मते कमीतकमी 14 दिवसांच्या लॉकडाऊनची आवश्यकता आहे. पण विरोधी पक्षाचा पूर्ण लॉकडाऊनला विरोध आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात रात्रीची संचारबंदीआणि विकेंड लॉकडाऊन लावण्यात आला आहे.

राज्यातील कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार लॉकडाऊन लागू करण्याच्या तयारीत आहे. याबाबतचा निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व विरोधी पक्षांची बैठक बोलावली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. आठ दिवस लॉकडाऊन ठेवू. त्यानंतर एक एक गोष्टी सोडू, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मात्र, तज्ज्ञांच्या मते कमीतकमी 14 दिवसांच्या लॉकडाऊनची आवश्यकता आहे. पण विरोधी पक्षाचा पूर्ण लॉकडाऊनला विरोध आहे.

ऑनलाईन होणाऱ्या या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  अजित पवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण,  भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील  यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांची उपस्थिती आहे. संध्याकाळी 5 वा. या बैठकीला सुरुवात झाली.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.