इंदापूर तालुक्यात पिलेवाडीच्या गावकऱ्यांची स्व. अभिजित पवार यांच्या प्रथम वर्षश्राद्ध निमित्त रक्तदान करून अनोखी श्रद्धांजली!

Spread the love

भिगवण | श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्याच्या वतीने ट्रस्ट चे संस्थापक/अध्यक्ष मा. श्री भूषण सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गरजू व्यक्तीला मोफत रक्त मिळवून देण्याची संकल्पना आम्ही राबवत आहे. पिलेवाडी पोस्ट कळस येथे स्वर्गीय अभिजीत बिबीशन पवार यांच्या प्रथम वर्ष श्रद्धा निमित्त श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट, हिंदवी स्वराज्य ग्रुप, व स्व अभिजित पवार मित्र परिवार यांनी घेतलेला रक्त शिबिरात विक्रमी गावची लोकसंख्या 800 ते 900 इवढी कमी असताना देखील अशा गावात 75 बाटल्यांचे रक्तसंकलन झाले, यावेळी शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने रक्तदात्याला प्रोत्साहन पर म्हणून रक्त संक्रमण परिषदेच्या नियमानुसार ट्रस्टचा लोगो असलेला टी शर्ट प्रत्येकाला भेट देण्यात आला. या शिबिरास रक्तदात्यांनि चांगलीच साथ देत रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी व शिवशंभू ट्रस्ट वरती विश्वास ठेऊन मोठ्या प्रमाणात रक्तदान केले.

संपूर्ण महाराष्ट्राला शिवशंभू ट्रस्टच्या रक्तदानाबद्दल माहिती आहे लॉकडाऊन च्या काळातही शिवशंभू ट्रस्टने रक्ताच्या तुटवड्यापासून महाराष्ट्राला वाचविले होते, व ज्या ज्या लोकांनी आजपर्यंत ट्रस्ट वरती विश्वास ठेऊन रक्तदान केले आहे अश्या लोकांना वेळोवेळी शिवशंभू ट्रस्ट च्या माध्यमातून मदत झाली आहे त्यामुळे हे सर्व लक्षात घेऊनच लोक जिथे जिथे शिवशंभू ट्रस्टच्या माध्यमातून रक्तदान शिबीर असतील तिथे तिथे रक्तदान करतात हे मात्र आता नक्की झाले आहे असे यावेळी काही रक्तदात्यांची व ज्यांना मोफत बॅग मिळाली आहे अश्या रुग्णांनी बोलताना सांगितले.

या रक्तदानासाठी विशाल भैया भांडवलकर प्रवीण पवार राहुल पवार विश्वजीत भांडवलकर संतोष निंबाळकर व मित्रपरिवाराने मेहनत घेतली. परंतु शिबिरास अभिजित पवार चे जिगरबाज मित्र सुनिल जगताप यांनीही आवर्जून भेट दिली परंतु वजन आणि हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे आम्हांला रक्तदान करता येत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

व यापुढे कायम आम्ही आहोत तोपर्यंत अभिजित पवार साठी कायम त्याची उणीव भरून काढण्यासाठी सामाजिक कार्य, रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबीर आयोजित करणार असल्याचेही विशाल भैया भांडवलकर यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.