कर्मयोगी साखर कारखान्याच्या बाबत राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे लक्ष; राष्ट्रवादी ने निवडणूक लढवावी शेतकऱ्यांची इच्छा!

Spread the love

इंदापूर | इंदापूर तालुक्यातील सहकार क्षेत्रात महत्वाचा भाग असलेल्या कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे.नुकत्याच जाहीर झालेल्या या निवडणुकीत २२ सप्टेंबर पासून नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे,तर २४ सप्टेंबर नामनिर्देशन अर्ज भरण्याची शेवटची तारीख असणार आहे. कारखाना स्थापनेपासून पाटील घराण्याकडे कारखान्याची सत्ता आहे.सहकार महर्षी मा.शंकरराव पाटलांनी मोठ्या कष्टाने उभा केलेला हा कारखाना सध्या वाईट अवस्थेतुन जात आहे.मागील ५ वर्षांमध्ये कारखान्याचे चेअरमन मा.मंत्री हर्षवर्धन पाटील आहेत.

कारखान्याची सुरू असलेली अधोगती, शेतकऱ्यांना वेळेवर न मिळणारी बिले, कामगारांचे थकलेले पगार,सभासद तसेच कामगारांच्या नावावर त्यांना न कळू देता काढलेले कर्ज यामुळे कारखाना कायम नकारात्मक विषयांनी चर्चेत राहिला आहे. इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय मामा भरणे यांनी मागील निवडणुकीत लक्ष न दिल्यामुळे मागील निवडणूक हर्षवर्धन पाटलांसाठी सोप्पी झाली होती. या निवडणुकीला मात्र आमदार आणि राज्याच्या मंत्रिमंडळात असलेले दत्ता मामा भरणे काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.तालुक्यातील उजनी बॅकवॉटर क्षेत्रातील शेतकरी मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी कडे वळलेले आहेत. त्या शेतकऱ्यांची राष्ट्रवादी ने ही निवडणूक लढवावी अशी इच्छा आहे.

राष्ट्रवादी राज्यात सत्तेत आहे,कारखाना जर राष्ट्रवादी च्या ताब्यात आला तर कारखान्याला आता जे दिवस आले आहेत तसे दिवस राहणार नाहीत, शेतकऱ्यांची उसाची बिले, कामगारांचे पगार व्यवस्थित होतील अशी आशा शेतकरी आणि कामगार वर्गास आहे. त्यामुळे राज्यमंत्री दत्ता मामा भरणे काय गुगली टाकतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेले आहे.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.