सामाजिक कार्याची दखल घेऊन शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या पुणे उपजिल्हा समन्वयक पदी इंदापूरच्या भूषण सुर्वे यांची नियुक्ती!

Spread the love

पुणे | इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी मधून युवकांना एकत्र करून महाराष्ट्रभर रक्तदानाची चळवळ उभी करण्याचे काम शिवशंभू ट्रस्टचे संस्थापक शिवश्री भूषण सुर्वे यांनी केलं. मग त्यामध्ये गोरगरीब रुग्णांना मोफत रक्ताची बॅग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उपलब्ध करून देणे, रक्तदाता देणे व्हाट्सअप च्या माध्यमातून मदत करणे हे सगळे ३ वर्ष अखंडितपणे चालू आहे. यामध्ये सामाजिक कार्याला हातभार लागावं व आणखी जे जे रुग्ण सरकारच्या योजनेवाचून मुक्त आहेत अशा रुग्णांना हॉस्पिटलच्या माध्यमातून मदत व्हावी या हेतूने हि जबाबदारी मी स्वीकारली आहे असे भूषण सुर्वे यांनी यावेळी बोलताना सांगितले. या सर्व कार्याची दखल घेऊन वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षामध्ये गणपती बाप्पा च्या आगमनाच्या दिवशी पुण्यामध्ये कक्षाचे प्रमुख, मा मंगेश चिवटे साहेब, पुणे शहर व पश्चिम महाराष्ट्राचे संपर्कप्रमुख मा राजाभाऊ भिलारे यांनी पुणे उपजिल्हा समन्वयक या पदी सुर्वे यांची नियुक्ती केली.

नेमके शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष काय आहे?
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षातून सर्व गोरगरीब तथा आर्थिक दुर्बल घटकातील आणि निर्धन रुग्णांना मदत आणि मार्गदर्शन केले जाते (फक्त गंभीर आजार आणि शस्त्रक्रिया साठी). अँजिओप्लास्टी /बायपास सर्जरी आणि हृदयरोग संबंधित सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, सर्व प्रकारचे कर्करोग, क्नी रिप्लेसमेंट, जन्मतः कर्णबधीर मुलांचे कोकलीयर इम्प्लांट, किडनी ट्रान्सप्लांट, लिव्हर ट्रान्सप्लांट, बोन मारो ट्रान्सप्लांट, ब्रेन हॅमरेज आणि मेंदूच्या शस्त्रक्रिया यांसारख्या महागड्या शस्त्रक्रियासाठी गोरगरीब रुग्णांना धर्मादाय अंतर्गत नोंदणी असलेल्या हॉस्पिटलमध्ये मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचार मिळवून देण्यासाठी मदत करणे आणि पंतप्रधान वैद्यकीय मदत निधी, मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि विविध ट्रस्ट द्वारे गोरगरीब रुग्णांना मदत मिळवून देण्यासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षातून समन्वयाची भूमिका पार पाडली जाते.

मा. उद्धव ठाकरे साहेब
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या तत्वानुसार शिवसेना कार्यरत आहे. या राज्याचे नगरविकासमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली समाजकारणातील एक पुढचे पाऊल म्हणून १७ नोव्हेंबर २०१७ रोजी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. या कक्षाची औपचारिक स्थापना युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांचे शुभहस्ते करण्यात आली. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे तसेच कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांचे अनमोल सहकार्य कक्षास लाभले असून गेल्या तीन वर्षात कक्ष मुंबईपुरता मर्यादित न राहता आपली व्याप्ती महाराष्ट्रभर वाढवत असून आजवर हजारो रुग्णांना विनामूल्य तपासणी, औषध पुरवठा तसेच यथाशक्य आर्थिक सहकार्य मिळवून देण्याचे कार्य यशस्वीरीत्या करीत आहे.

मा. एकनाथ शिंदे साहेब
कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्य
“रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा” हे ब्रीद अंगीकारून समर्पित भावनेने शिवसेनेच्या वतीने मा. श्री. उद्धवजी ठाकरे, युवासेना प्रमुख श्री. आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना करण्यात आली. अवघ्या तीन वर्षाच्या कालावधीत गोर-गरीब रुग्ण खर्चिक उपचारापासून वंचित राहू नये याचा ध्यास घेऊन त्यांना मार्गदर्शन तसेच यथाशक्य आर्थिक मदत मिळवून देण्याचे कार्य कक्षप्रमुख श्री. मंगेश चिवटे आणि त्यांचे सहकारी दिवस-रात्र करत आहेत.
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची वेबसाईट लवकरच सुरु होत आहे. याचा जनसामान्यांना लाभ होईल असा मला विश्वास आहे. या उपक्रमास माझ्या अगणित शुभेच्छा.

मा. डॉ. श्रीकांत शिंदे साहेब
खासदार
आज राज्यात आर्थिक दुर्बल रुग्णांचा प्रश्न चिंताग्रस्त करणारा आहे. केवळ प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमुळे अनेकांना वैद्यकीय उपचारांपासून वंचित राहावे लागत आहे. त्या परिस्थितीवर मात करण्याच्या शासनाच्या विविध योजनांतर्गत मोफत उपचार किंवा सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया, उपचार तसेच औषध पुरवठा व्हावा या दृष्टीने शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यथाशक्य / सर्वोतपरी मदत करीत आहे. तीन वर्षांच्या कालावधीत कक्षाच्या वतीने महाराष्ट्रात विविध ठिकाणी विनामूल्य आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले ज्याचा लाभ आजवर लाखो रुग्णांना झाला हे कौतुकास्पद आहे. कक्षाच्या भावी वाटचालीस मी मनःपूर्वक शुभेच्छा देत आहे.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.