भ्रष्टाचार विरोधी जनशक्ती संघटनेची वाटचाल जोरात; पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी शिवशंभू ट्रस्टचे अध्यक्ष शिवश्री भूषण सुर्वे यांची नियुक्ती!

Spread the love

इंदापुर | महाराष्ट्रामध्ये अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी तसेच समाजातील लोकांना न्याय देण्यासाठी इंदापुर तालुक्यातील मा नितीन दादा जगताप यांनी (Gov of india CVC under) भ्रष्टाचार विरोधी जनशक्ती ही सामाजिक संस्था स्थापन (रजिस्टर) करून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर या संस्थेचे काम चालू केले.

त्यामध्ये संघटनेचे ध्येय व धोरणे तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी छायाताई केवळे प्रदेशाध्यक्ष महिला आघाडी, विनोद नदुर्गे प्रदेशाध्यक्ष युवक, हनुमंत घोडके प्रदेश संपर्क प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण महाराष्ट्रात पदनियुक्ती करण्यात येत आहे त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर (बीड, पुणे, करमाळा, भूम, सातारा, पिंपरी-चिंचवड ) युवकांना एकत्र करून रक्तदानाची चळवळ उभी करणारे शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट चे संस्थापक/अध्यक्ष शिवश्री भूषण सुर्वे यांची पुणे जिल्हा युवक उपाध्यक्ष पदी निवड करून निवडीचे पत्र देण्यात आले.

तसेच नंदकिशोर नीलकंठ प्रदेश कार्याध्यक्ष सांगली, हाजी बिलाल भाई शेख प्रदेश उपाध्यक्ष सोलापूर, गौतम लोटे प्रदेश सरचिटणीस सांगली, प्रशांत खाडे प्रदेश उपाध्यक्ष कोल्हापूर, सत्ताप्पा कांबळे शहराध्यक्ष कोल्हापूर, महादेव आयरे जिल्हाध्यक्ष सोलापूर, दीपाली लोखंडे महिला प्रदेश सरचिटणीस, सुभाष जगताप पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, चेतन बागल प्रदेश उपाध्यक्ष युवक, सिद्धनाथ माने जिल्हाध्यक्ष युवक पुणे, शब्बीर शेख जिल्हाध्यक्ष पुणे, निवास अवघडे जिल्हाध्यक्ष कोल्हापूर ग्रामीण, अनिल चव्हाण इंदापुर शहराध्यक्ष, प्रकाश जाधव सोलापूर शहराध्यक्ष, हाजी मुस्ताक कार्याध्यक्ष या सर्वांची निवड करण्यात आली, व पुढेही ही संघटना मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात असणार आहे असे मत संस्थापक अध्यक्ष नितीनजी जगताप यांनी व्यक्त केले.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.