अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या इंदापूर तालुका सचिवपदी धनंजय कळमकर यांची सर्वानुमते निवड!

Spread the love

इंदापुर | अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संघाच्या इंदापूर तालुका सचिवपदी साप्ताहिक शिवसृष्टीचे संपादक,पत्रकार धनंजय कळमकर यांची निवड करण्यात आली आहे.

नूतन सचिव धनंजय कळमकर यांनी गेली १५ वर्षापासून आपल्या निर्भीड, निःपक्ष लिखानाने अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले असून पत्रकार क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटविला आहे. त्यांनी “नागरीक समता” या साप्ताहिकाच्या माध्यमातून आपल्या लेखणीची सुरुवात केली.दैनिक बंधुप्रेम,अजोती वैभव साप्ताहिका मध्ये कार्यकारी संपादक म्हणून काम पाहिले. साप्ताहिक सहकारवाणी, सध्या ते साप्ताहिक शिवसृष्टीचे संपादक म्हणून काम करत आहेत. तसेच शिवसृष्टी वेब पोर्टल युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून त्यांनी आपल्या लेखणीतून समाजातील अन्यायांना, सर्वसामान्यांचे प्रश्न याला वाचा फोडली आहे.

वेब पोर्टलचे तालुकाध्यक्ष शैलेश काटे,इलेक्ट्रॉनिक्स् मिडिया व प्रिंटचे पत्रकार कैलास पवार,ग्रामीण महाराष्ट्र न्यूजचे दीपक खिलारे यांनी त्यांचे नाव सुचवले. संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ.संदेश शहा, जिल्हा निरीक्षक शौकत तांबोळी, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख काकासाहेब मांढरे, तालुकाध्यक्ष राजेंद्र कवडे देशमुख,शहराध्यक्ष सुरेश जकाते यांनी त्यांच्या निवडीची घोषणा केली.

या निवडीनंतर नूतन सचिव धनंजय कळमकर म्हणाले की, अखिल मराठी पत्रकार परिषद संघाने जी जबाबदारी माझ्यावर दिली आहे.ती जबाबदारी प्रामाणिकपणाने पार पाडून अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष एम.डी. शेख, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष डॉ.विकास शहा व कार्याध्यक्ष अतुल तेरखेडकर, सा.लक्ष्मी वैभवचे संपादक विलासराव गाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटना मजबूत करुन ग्रामीण पत्रकारांचे प्रश्न सर्वाच्या सहकार्याने मार्गी लावण्याचा प्रयत्न करु असे धनंजय कळमकर यांनी निवडीनंतर सांगितले. या निवडीच्या सत्कारावेळी संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ.संदेश शहा, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख काकासाहेब मांढरे,शहराध्यक्ष सुरेश जकाते, पत्रकार कैलास पवार,असिफभाई शेख, जितेंद्र जाधव, तात्यासाहेब पवार,प्रदीप पवार,दीपक खिलारे उपस्थित होते.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.