बारामतीच्या रुग्णाची ठाण्यामध्ये मोफत शस्त्रक्रिया; आरोग्यदूत संवेदनशील मुख्यमंत्र्यांचे मानले आभार!
मुंबई । माळेगाव ता. बारामती येथील मराठा समाजाचे अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील श्री. अरुण चव्हाण यांचा 33 वर्षीय तरूण मुलगा सुमित चव्हाण हा डेकोरेशनचे कामावरती असताना 35 ते 40 फूट उंचीवरून खाली पडला त्यामुळे त्याचे दोन्ही खुबे निकामी झाल्याने तो आधू झाला होता. डॉक्टरांनी दोन्ही खुब्याचे आँपरेशन करण्याचा सल्ला रूग्णास दिला होता.
आधीच आर्थिक परिस्थिती बेताची त्यात आँपरेशनचा जवळपास ३ ते ४ लाखांचा एवढा मोठा खर्च ते करू शकत नव्हते म्हणून ते कुठून काही मदत मिळते का ते पहात होते. तेव्हा त्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. सुरेंद्र जेवरे यांना मदतीची मागणी केली असता सुरेंद्र जेवरे यांनी तात्काळ शिवसेनेचे वरिष्ठ संपर्क नेते मा. संजय मशिलकर साहेब यांना सदर गरजू रुग्णाचे मोफत आँपरेशन करण्याची विनंती केली त्यावेळी मशिलकर साहेबांनी फक्त एका फोनवरती ठाणे येथील कॅशलेस असलेले मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे हाँस्पीटल मधून रूग्णास फोन गेला व त्याला बोलावून ता . 3/7/2024 रोजी त्याची संपूर्ण शस्त्रक्रिया मोफत पार पाडली.
शस्त्रक्रिया पार पडताच शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्र जेवरे हे स्वतःहा तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पुणे जिल्हा कक्ष प्रमुख भूषण सुर्वे तसेच ठाणे शहर प्रमुख भरत गोपाळे यांनी रात्री २ वाजता ठाणे येथे जाऊन रुग्णास भेटले त्यामुळे रुग्ण व त्याचे वडील यांना आश्रू अनावर झाले व त्यांनी उच्च दर्जाच्या व मोफत मिळालेल्या सेवेबद्दल मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब, मा. संजय मशिलकर साहेब तसेच जिल्हा प्रमुख सुरेंद्र जेवरे यांचे आभार मानले.
माळेगाव कारखान्याचे मा. चेअरमन रंजनकाका तावरे यांनी देखील फोनवरून सुरेंद्र जेवरे व शिवसेनेचे यांचे आभार मानले. तसेच लवकरच बारामती मधे रुणांच्या सेवेसाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे स्वतंत्र ऑफिस चालू होणार असल्याचे जेवरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.