महाराष्ट्रातील साखर कारखानदारांच्या अडचणी घेवून देवेंद्र फडणवीस अमित शहांच्या भेटीला? - MahaMetroNews Best News Website in Pune

महाराष्ट्रातील साखर कारखानदारांच्या अडचणी घेवून देवेंद्र फडणवीस अमित शहांच्या भेटीला?

मुंबई | साखर उद्योगातील अडचणीत असलेल्या कारखान्यांच्या कर्ज पुनर्गठनासह विविध प्रश्नांसंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन चर्चा केली, अशी माहिती माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

 

महाराष्ट्रातल्या साखर उद्योगाला अर्थसहाय्य करण्यासंदर्भात दिल्ली येथे मंत्रीगटाचे प्रमुख अमित शाह आणि भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जे.पी. नड्डाजी यांच्या प्रमुख उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीवेळी भाजप नेते रणजितसिंह मोहिते पाटील व आमदार राहुल कुल उपस्थित होते .

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.