पुणे-सोलापूर महामार्गावर बनतोय दहशतीचा अड्डा; टोल वसूल कंपनीचा आंधळा कारभार,जीव गेला तर जबाबदार कोण?
कुरकुंभ | पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रावणगाव (ता. दौंड) हद्दीत पुण्याकडे जाणाऱ्या इनोव्हा गाडीला मारूती कार आडवी लावून चार जणांनी धारधार शस्त्राने हल्ला केला. त्यामध्ये एक जण जखमी झाला असून हल्लेखोरापैकी एकाला अटक करण्यात आली तर तीन जण पळून गेले. ही घटना रविवारी मध्यरात्री घडली असून गुन्हा सोमवारी दाखल करण्यात आला आहे. – ‘नासा’ला जमलं नाही ते ‘आयुका’नं करून दाखवलं; अत्यंत दूरच्या दीर्घिकेचा घेतला शोध
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्री आकाश रावसाहेब फराटे हे आई अनिता यांच्यासह इनोव्हा गाडीतून (एमएच-14, एचपी-97) मधून पुणे – सोलापूर महामार्गावरून पिंपरी चिंचवड पुण्याकडे परत होते. रावणगाव हद्दीत अचानक मारूती कार (एमएच-48, एफ-2374) फराटे यांच्या इनोव्हा गाडीला आडवी लागून अचानक कारमधील चौघांनी आकाश रावसाहेब फराटे (रा. पिंपरी चिंचवड,पुणे) यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यामध्ये आकाश फराटे जखमी झाले तर, गाडीतील आकाशची आई व इतर महिलांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. पुणे-सोलापूर महामार्गावर वाहनचालक, प्रवाशांवर हल्ले व लुटमार होण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांपासून वाढले आहे. काही दिवसांपूर्वीच मळद येथे एका वाहनचालकाचा खून झाल्याची घटना ताजी आहे. हे प्रकार रोखण्यासाठी पोलिस, टोल वसुली करणाऱ्या कंपनीने एकत्रित प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.