डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृहावर तोडफोड व हल्ल्याच्या निषेधार्थ इंदापुरमध्ये ही तीव्र निषेध!
इंदापूर | भारतरत्न, घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबई येथील निवास्थान असणाऱ्या (राजगृहावर) अज्ञात इसमांकडून हल्ला करत तोडफोड करण्यात आली, या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज पीपल्स रिपब्लिकन पार्टी यांच्यावतीने, इंदापूर तालुका मागासवर्गीय समाजबांधव पळसदेव व प्रविणभैय्या माने मित्रपरिवाराच्या वतीने इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांना निवेदन देत, या घटनेची सखोल चौकशी होऊन, गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी हि मागणी यावेळी करण्यात आलेली आहे.
यावेळी माजी बांधकाम व आरोग्य समिती सभापती,पुणे जिल्हा परिषद सदस्य मा.श्री.प्रविणभैय्या माने,पश्चिम महाराष्ट्र पिपल्स रिपब्लिकन पार्टीअध्यक्ष संजयभैय्या सोनवणे ,मेघराज कुचेकर, नितीन आरडे, विकास भोसले, अभिजित गायकवाड, कैलास भोसले, मिथुन भोसले, अंकुश भोसले, महेंद्र सोनवणे, आगंत गायकवाड, अनंता बोडके, दादासाहेब शेंडे व इतर सहकारी मान्यवर उपस्थित होते.