“जे बोलतो ते करून दाखवतो,” उपमुख्यमंत्री अजित दादांचे अखिल भारतीय मराठा सेवा संघाच्या वतीने आभार!

Spread the love

इंदापुर | मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासासाठी कार्यरत ‘सारथी’ संस्थेला आठ कोटी रुपयांचा निधी अवघ्या काही तासात देत, असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केल्यानंतर अवघ्या दोन तासातंच हा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. याबद्दल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आजित दादा पवार यांचे अखिल भारतीय मराठा सेवा संघाच्या वतीने स्वागत व आभार व्यक्त केले

‘सारथी’ संस्थेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी ११ वाजता मंत्रालयातील त्यांच्या दालनात खासदार छत्रपती संभाजीराजे व मराठा समाज प्रतिनिधींची बैठक घेतली. दुपारी दिड वाजता पत्रकार परिषदेत ८ कोटी देणार असल्याचे जाहीर केले.

‘सारथी’ आणि ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ’ या दोन्ही संस्था अनुक्रमे ओबीसी व कौशल्य विकास मंत्रालयाऐवजी पुढच्या काळात नियोजन विभागांतर्गत काम करतील.

ज्याप्रमाणे सारथी संस्थेबाबत उप-मुख्यमंत्री अजितदादांनी निर्णयक्षमता दाखवली त्याबद्दल स्वागत पण अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाला 50 कोटींची तरतूद करण्यात आहे ही तरतूद 500कोटीची करण्यात यावी ही अनेक वर्षाची मागणी आहे ती मागणी येणाऱ्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी पूर्ण करावे अशी मागणी अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष पवन घोगरे यांनी केली

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.