यळकोट यळकोट जय मल्हार करत मुख्यमंत्र्यांच्या, पाटलांच्या अन् चिवटेंच्या नावानं जेजुरीत चांगभलं !
पुणे जिल्हा | कार्यकर्ता, चाहता आपल्या लाडक्या नेतृत्वाप्रती, आदर्शाप्रती सद्भावना अनेक प्रकारे व्यक्त करताना आपण आजवर पाहिलेले आहे. कोणी आपल्या गुरुला दीर्घायुष्य लाभावे म्हणून पायी चालत एखाद्या श्रद्धास्थान असलेल्या तीर्थक्षेत्राला जातं, कोणी उपवास धरतं, कोणी गरीबांना अन्नदान करतं अशा नानाविध मार्गाने कार्यकर्ता आपलं प्रेम व्यक्त करतो. नुकताच राज्य शासनाने मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांकरिता मुंबईच्या वेशीवर अर्थात् वाशीमध्ये अध्यादेश काढला. हा अध्यादेश काढण्यासाठी ज्या व्यक्तीने आपले प्राण पणाला लावले ते म्हणजे मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील या व्यक्तीने मागील ७ महिन्यात आपल्या जीवाची कसलीही पर्वा केलेली नाही.
याचबरोबर ज्यांनी या मागण्यांना कायम सकारात्मक घेत शासन समाजाच्या बाजूने आहे ही भावना खूप धाडसाने लोकांच्या गळी उतरवली ते या महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री ना. श्री एकनाथजी शिंदे साहेब. या दोन महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये आणि शासन-आंदोलक या व्यवस्थेमध्ये संवाद आणि समन्वय ठेवणारे संवाददूत मुख्यमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी तथा मुख्यमंत्री सहायता निधीचे श्री मंगेशजी चिवटे या आपल्या तीनही नेतृत्वांना उदंड निरोगी दीर्घायुष्य लाभावं यासाठी मंगेश चिवटे यांचे विश्वासू सहकारी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पुणे जिल्हा ग्रामीण कक्ष प्रमुख तथा सोशल मीडिया प्रमुख असणारे भूषण सुर्वे यांनी त्यांच्या गुरुंना म्हणजेच चिवटेंना वाशीमध्ये त्या २ दिवसांमध्ये धावपळींच्या समन्वयादरम्यान चक्कर आल्यानंतर वैद्यकीय मदत कक्षाच्या पदाधिकाऱ्यामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते याचवेळी भूषण सुर्वे यांनी थेट जेजुरी गडावर जात श्री मल्हारी मार्तंडाच्या चरणी दर्शन घेत भंडाऱ्याची उधळण केली. खंडेरायाचरणी आपल्या या गुरूंना निरोगी ठेव आणि सत्कार्यासाठी बळ दे अशी प्रार्थना केली.
– डॉ.शार्दुल संतोषराव भणगे-धामणगांवकर