Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

महाराष्ट्राला रक्तदान आणि प्लाझ्मादानाची गरज; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वाढदिवसा दिवशी आव्हान!

Spread the love

मुंबई | सर्व शिवसैनिकांनी कोरोनाचा सक्षम मुकाबला करण्यासाठी रक्तदान शिबीर, प्लाझ्मादान शिबीर आयोजित करावे, पुन्हा एकदा महाराष्ट्राला रक्ताचा तुटवडा भासण्याची दाट शक्यता असल्यामुळे असे आवाहनही उद्धव ठाकरेंनी केल आहे.

राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज  आज साठावा वाढदिवस आहे. राज्य कोरोना सारख्या संकटाचा मुकाबला करत असल्यामुळे उद्धव ठाकरे वाढदिवस साजरा करणार नाही असे जाहीर केले आहे. तसंच, त्यांनी कार्यकर्त्यांना एक महत्त्वाची सूचनाही केली आहे.आज वाढदिवसाच्या दिवशी उद्धव ठाकरे हे ‘मातोश्री’वर पहिल्या मजल्यावरील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीतील त्यांच्या स्मृतींना उद्धव ठाकरे वंदन करतील. त्यानंतर ठाकरे कुटुंबातील महिला सकाळी उद्धव ठाकरेंचे औक्षण करणार आहेत.

राज्यात कोरोनाची परिस्थिती बिकट असल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. बॅनर, होर्डिंग न लावण्याची सूचनाही केली आहे. तसंच, या वर्षी शिवसैनिकांनी ‘मातोश्री’वर शुभेच्छा देण्यासाठी येऊ नये, असे आदेश उद्धव ठाकरेंनीच दिले आहे.

Exit mobile version