Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

भारतात कोरोनाच्या तीन लसीच्या मानवी चाचण्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यावर?

Spread the love

दिल्ली : भारतात सध्या तीन कंपन्यांच्या कोरोना व्हायरसच्या लसींवर मानवी चाचण्यांच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यावर काम करत आहे. १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावरूनच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत उल्लेख केला.

भारत बायोटेक और आईसीएमआर

भारताची पहिली संभाव्य कोरोनावरील प्रभावी लस ‘कोवॅक्सिन’चे ह्युमन क्लिनिकल चाचणी दिल्ली, पाटना, भुवनेश्वर, चंडिगढसह देशातील १२ ठिकाणी सुरू आहे. कोवॅक्सिनची निर्मिती भारत बायोटेक, आयसीएमआर आणि नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयवी)ने एकत्र येऊन केली आहे. याची निर्मिती कंपनीच्या हैदराबाद येथील प्रकल्पात होणार आहे.

जायडस कॅडिला

जायडस कॅडिलाने प्लाज्मिड डीएनए वॅक्सिन ‘जायकोवी-डी’ची ६ ऑगस्टपासून दुसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणी सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यातील चाचणी यशस्वी झाली असून लस सुरक्षित असल्याचे निदान झाले आहे. ज्या स्वयंसेवकांना लस देण्यात आली त्यांच्यात सकारात्मक परिणाम दिसले आहेत.

सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया

सीरम इंस्टीट्यूत ऑफ इंडिया यावर्षाच्या अखेर कोरोना लस तयार करेल. सीरम इंस्टीट्यूट ‘एस्ट्रजेनेका ऑक्सफर्ड वॅक्सीन’वर काम करत आहे. त्यांची तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणी सुरू आहे. भारतात ऑगस्टमध्ये या लसीची मानवी चाचणी सुरू होणार आहे.

Exit mobile version