राखी पौर्णिमेनिमित्त ‘जिव्हाळ्याच्या रेशीमगाठी – एक राखी कोरोनावीर डॉक्टरांसाठी!
असंख्य भगिनींचे व त्यांच्या कुटुंबीयांचे डॉक्टर बांधवांनी कोरोनापासून रक्षण केले आहे. हातावर रक्षेचे बंधन बांधलेले नसतानाही या बांधवांनी हे अलिखित नाते जोपासले आणि सक्षमपणे निभावले आहे.
राखी पौर्णिमेनिमित्त ‘जिव्हाळ्याच्या रेशीमगाठी – एक राखी कोरोनावीर डॉक्टरांसाठी’ हा संवेदनशील उपक्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही आयोजित करत आहोत. पुण्यातील भगिनींच्या नावे राखी महाराष्ट्रातील कोरोनाकाळात काम करणाऱ्या डॉक्टरांना आम्ही पाठवत आहोत. अनोळखी भावांविषयी आपलेपणाने कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या हृदयस्पर्शी व अनोख्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी अपेक्षेपेक्षा मोठा प्रतिसाद मिळाला. यापैकीच काही सहभागी माताभगिनींनी या उपक्रमाविषयी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केल्या. नवनवीन समाजोपयोगी उपक्रम हाती घेण्यासाठी असाच आशीर्वादाचा हात व मोलाची साथ सदैव माझ्या सोबत असू द्या!
डॉक्टर बांधवांच्या कार्याचा सन्मान म्हणून येत्या रक्षाबंधनाला एक राखी ही आपल्या नावाने त्यांना पाठवण्याचा संकल्प आम्ही केला आहे. राज्यातील हजारो डॉक्टर्स बांधवाना ही राखी आपल्या नावे आपल्या परवानगी नुसार पाठवण्यात येणार आहे. ती राखी डॉक्टर बांधवांना पोहचवण्याची जबाबदारी आम्ही घेऊ.
चला तर मग या उपक्रमात सहभागी होण्यासाठी,
आपले नाव, मोबाईल नंबर आणि पत्ता खालील क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. किंवा, www.sunnynimhan.com या वेबसाईटवर रजिस्टर करा.
संपर्क: 8308123555