कोरोणा काळातही सहकारी बँकाकडून कर्जदारांना जप्तिच्या नोटीसा तात्काळ बंद करा; वंचीत बहुजन आघाडी!
परवेज मुल्ला
उस्मानाबाद :
गेल्या वर्षभरापासून सर्वत्र कोरोणामुळे आर्थीक टंचाई असून तरिही कळंब तालुक्यात उस्मानाबाद जनता बँकेकडून थकित कर्जदारांना गहाण ठवलेल्या जागा जप्त क२णार असल्याच्या नोटीसा देण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये तिव्र संताप असून बँकेने नोटीसा देणे व जप्तीचे आदेश तात्काळ थांबवावेत अन्यथा तिव्र आंदोलन करण्याचा इशारा वंचीत बहुजन आघाडीचे तालूका अध्यक्ष राजाभाऊ मळगे यांनी जिल्हा अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे . अधिक वृत्त असे कि , वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष मळगे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या वर्षभरापासून सर्वत्र कोरोणामुळे आर्थिक टंचाई असून या वर्षीही कोरोणाचा प्रादुर्भाव चालूच आहे. गेल्या वर्षी शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने संपूर्ण पिके वाया गेली या वर्षीही अवकाळी ने गहू, हरभरा, ऊस, वाया गेले त्यामुळे शेतकरी पून्हा संकटात आहे असे असताना ही उस्मानाबाद जनता सहकारी बँकेने कर्जदारांना बँकेने त्यांच्याकडे गहाण असलेल्या जमीनी जागा ताब्यात घेण्याच्या नोटीसा दिल्या आहेत त्यामुळे शेतकरी व कर्जदारांमध्ये भितीचे वातावरण असून सर्व तणावाखाली आहेत
.
त्यात एखाद्या कर्जदारांने जिवाचे बरे वाईट केले तर याला जबाबदार कोण ? असा सवालही मळगे यांनी केला आहे. निवेदनात पूढे म्हटले आहे कि जिल्हा अधिकाऱ्यांनी बँकेला सर्व नोटीसा देणे व जागा ताब्यात घेणे बंद करण्याचे आदेश घ्यावेत व सर्व थकित कर्जदारांना कर्ज भरण्यासाठी एक वर्षाची मुदत वाढ दयावी जर बँकेने हूकुमशाही पद्धत बंद नाही केली तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तिव्र आंदोलन करण्याचा इशाराही मळगे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे .