अजितदादांचा पुण्यासाठी आणखी एक महत्वाचा निर्णय; वाचा सविस्तर
पुणे | राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. त्यातही पुणे शहरात कोरोनाबाधितांचा आकडा सर्वाधिक आहे. पुण्याला कोरोनातून मुक्त करण्यासाठी मुंबईच्या अधिकाऱ्याने सांगितलेला पॅटर्न वापरावा, असा आदेश खुद्द पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.
धारावीच्या धर्तीवर पुण्यात एकही रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेण्याचे आदेश अजित पवारांनी मनपा आयुक्तांना दिले आहे. पुण्यात कोरोनाने थैमान घातलं आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. संपूर्ण जिल्ह्यात पुन्हा एकदा लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासाठी खास मुंबईचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांना पुण्यात पाचारण केले.
पुण्याला लवकरात लवकर कोरोनातून मुक्त करण्यासाठी धारावी पॅटर्नसारखे काम करावे, अशी सूचनाही पवारांनी सर्व अधिकाऱ्यांना दिली.