अकलूजमध्ये श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टच्या रक्तदान शिबिरास उत्स्फुर्त प्रतिसाद; 75 रक्ताच्या बॅगेचे संकलन!

अकलूज | आज बुधवार, दिनांक,०४/०५/२०२२ रोजी धर्मवीर छत्रपती श्री शंभू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून, व तसेच मा. श्री. फत्तेसिंहदादा माने- पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट ,महाराष्ट्र राज्य, अकलूज विभाग व शिवशंभु प्रतिष्ठान,नवचारी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन प्राथमिक शाळा नवचारी, या ठिकाणी करण्यात आले होते. या शिबिरामध्ये तब्बल 75 रक्तदात्यांनी रक्तदान करून आपला रक्तदानाचा हक्क बजावला. या सर्व 75 रक्तदात्यांचे श्री शिवशंभू चारीटेबल ट्रस्ट व श्री शिवशंभु प्रतिष्ठान,नवचारी यांच्याकडून मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन.
श्री भूषण सुर्वे सर संस्थापक अध्यक्ष (श्री शिव शंभू चारीटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य) यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री. रणजितदादा गायकवाड (श्री शिव शंभू चारीटेबल ट्रस्ट माळशिरस तालुका प्रमुख) यांच्या सहकार्याने माळशिरस तालुक्यातील हे 6 वे शिबिर यशस्वीरीत्या पार पाडण्यात आले. या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभ वेळी
उपस्थित, मा.श्री. हंसराज भैय्या मानेपाटील .मा.श्री.सुजय भैय्या माने पाटील. श्रीराज माने पाटील . श्री कृष्णराज माने पाटील. बागेवाडी गावचे पोलीस पाटील शंकर बागडे साहेब, युवराज लोणकर. यांचे विषेश सहकार्य मिळाले.तसेच , दरम्यान उपस्थित, श्री शिव शंभू चारिटेबल ट्रस्ट चे इतर पदाधिकारी , श्री.सुरज दोरकर (अकलूज शहराध्यक्ष) श्री.प्रदीप मुळीक.(अकलूज शहर उपाध्यक्ष) चि. सुधीर पवार .(अकलूज शहर संघटक व प्रसिद्धी प्रमुख) व तसेच गणेश इंगळे, प्रथमेश भोसले, नितीन कांबळे ,विक्रम शिंदे, राहुल टीळेकर ,संग्राम खरात, सचिन धुमाळ, शंभूराजे कोकरे, सुजित थोरात,निखिल पवार ,गणेश बनकर, मंथन फुके, राजेश टिळेकर, यांचे सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले. या रक्तदान शिबिरासाठी अक्षय ब्लड बँक सोलापूर कडून डॉक्टर मोरे सर व त्यांचा संपूर्ण स्टाफ उपस्थित होता. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा रक्तदान शिबिराचा कारयकरम कारयकरमअतिशय उत्साहाच्या वातावरणात पार पडला व लक्षवेधी ठरला आणि लक्षवेधी ठरण्याचे मुख्य कारण म्हणजे यावेळी रणजितदादा गायकवाड (श्री शिव शंभू चॅरिटेबल ट्रस्ट माळशिरस तालुका प्रमुख) यांनी सलग 44 व्या वेळी रक्तदान केले.
दरम्यान श्री रणजीत दादा गायकवाड व सुधीर पवार यांनी आमच्याशी बोलताना गावातील सर्व तरुण मंडळींनी रक्तदानासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे व जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करने गरजेचे आहे जात-पात-धरम पक्ष बाजूला ठेवून रक्तदानासारख्या सामाजिक कार्यात गावातील प्रत्येक प्रतिष्टीत व्यक्तींनी सहभागी होऊन गावातील इतर नागरिकांना रक्तदानासाठी आव्हान करणे गरजेचे आहे.तरच सर्वांना रक्तदानाचे महत्त्व कळेल. असे सांगितले.