वारीच्या वाटेवर उपमुख्यमंत्री शिंदेंच्या माध्यमातून वारकऱ्यांच्या आरोग्याची घेतली जाते विशेष काळजी..!

Spread the love

इंदापूर (२८ जून २०२५) | पांडुरंग पांडुरंगाच्या नामस्मरणाने दंग झालेले वारकरी संप्रदाय पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करत असताना, एकही कष्टकरी शेतकरी, माझा वारकरी-धारकरी आरोग्याने बाधित होऊ नये यासाठी स्वतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व अजित पवार साहेब वारकऱ्यांची काळजी घेताना आपल्याला दिसत आहे.

आज जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे निमगाव केतकी तालुका इंदापूर येथे मुक्कामाच्या पूर्वसंध्येला उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने वारकऱ्यांच्या सेवेसाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे विशेष कार्य अधिकारी तथा उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेशजी चिवटे साहेब, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कार्याध्यक्ष रामहरी राऊत, आणि राज्य कार्यकारणी सदस्य भूषण सुर्वे, पुणे जिल्हा प्रमुख विशाल धुमाळ व इंदापूर तालुका प्रमुख सागर आवटे यांच्या माध्यमातून निमगाव केतकी येते वारकऱ्यांना आरोग्य सेवा देण्यात आली, यावेळी इंदापूर तालुक्याचे विद्यमान आमदार तथा क्रीडा मंत्री मा. श्री. दत्तात्रय भरणे यांनी ही यामध्ये सहभागी होऊन रेनकोट आणि आरोग्यकिट वाटप केले त्याचसोबत मंगेश चिवटे साहेबांचे विशेष कौतुक देखील केले यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष इंदापूर तालुक्यामधील संपूर्ण टीम यावेळी कार्यरत होती.

यावेळी उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यक कक्षाच्या माध्यमातून मोफत औषध किट वाटप यावेळी करण्यात आले सोबतच पावसापासून वारकरी सुरक्षित रहावा यासाठी भूषण सुर्वे त्यांची टीम श्रेयश दुबे, विनय दाभोळकर, अमेय पराडकर, धवल ठक्कर, हरीश राव, अक्षय ब्लड बँकेचे शुभम शिंदे या सर्वांच्या माध्यमातून 500 रेनकोटचे वाटप निमगाव केतकी येथे करण्यात आले सोबतच शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या आरोग्यवारीच्या गाडीमधून मोफत औषधाचा कॅम्प लावण्यात आला यावेळी हजारो वारकऱ्यांनी या सेवेचा लाभ घेतला, अशी सेवा माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब मंगेशजी चिवटे साहेब यांच्या माध्यमातून घडत राहो अशी भूषण सुर्वे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.