चला करु जोडीने रक्तदान, श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टचा ससून हॉस्पिटलसाठी अनोखा संकल्प.
६ डिसेंबर रोजी ससून हॉस्पिटलमध्ये रक्तदानाचे आयोजन.
पुणे | अनेक महिने राज्यात कोरोना संकटामुळे राज्यात तसेच पुणे जिल्ह्यात रक्ताचा खूप मोठा तुटवडा असल्याचे जाणवत आहे. या कारणास्तव गेली 3 वर्ष रक्तदान या क्षेत्रात कार्यरत असणारी श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट महा. राज्यच्या वतीने दि. ६ डिसेंबर रोजी “चला करु जोडीने रक्तदान” हा अनोखा संकल्प पुण्यामध्ये प्रथमच हाती घेतला असल्याची माहिती ट्रस्टचे संस्थापक/अध्यक्ष शिवश्री भुषण सुर्वे यांनी दिली.
आपल्या जोडीदारा सोबत ससून हॉस्पिटलमध्ये येऊन रक्तदान करुन समाजामध्ये एक वेगळा संदेश देण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावे असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
यावेळी बोलताना भुषण सुर्वे म्हणाले, रविवार दिनांक ६ डिसेंबर २०२० रोजी ससून हॉस्पिटल, पुणे येथे १०० लोक आपल्या जोडीदारासोबत (पत्नी सोबत ) रक्तदान करणार असून यासाठी अनेक जणांनी नाव नोंदणी देखील केली आहे.सरकारी हॉस्पिटलला असलेला रक्तसाठा अत्यंत कमी आहे व गोरगरिबांना मोफत रक्त मिळावे या हेतूने हा उपक्रम हाती घेतलेला असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र दर्पण न्यूज नेटवर्क, भारतीय जैन संघटना पुणे जिल्हा,ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशन, डिजिटल मीडिया जर्नालिस्ट असोसिएशन, महामेट्रो न्युज पोर्टल, इंडिया न्यूज 14, अखिल भारतीय मराठी पत्रकार संघ इंदापूर, रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान, युवा रक्षक संघटना महा. राज्य, भगवानराव भरणे प्रतिष्ठान, सोनाई प्रतिष्ठान, Chasa IDT Institute अशा अनेक संघटनांनी विशेष सहकार्य केले असून या संस्थांनी शुभेच्छा देत या उपक्रमात सहभाग घेतला असल्याची माहिती शिवश्री भुषण सुर्वे यांनी सांगितले.
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी व नाव नोंदणीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा :
शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य.
नावनोंदणीसाठी संपर्क : 9696960331, 8600201572, 8552001515, 7875042423
====================================