श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य, जलमंदीर प्रतिष्ठान सोमनाथभाऊ फाउंडेशन यांच्या वतीने कळंब येथे भव्य रक्तदान शिबीर संपन्न!

Spread the love

उस्मानाबाद | श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य, जलमंदीर प्रतिष्ठान तथा सोमनाथभाऊ फाउंडेशन यांच्या वतीने कळंब येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक, छत्रपती संभाजीराजे शाँपींग सेंटर येथे साहित्यसम्राट डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त तसेच भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. जलमंदीर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अजित भैय्या काळे यांच्या हस्ते रक्तदान शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जवळपास ७६ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

या कार्यक्रमास अॅड. शकुंतला फाटक-सावळे, संध्या सोनटक्के, अकीब पटेल, श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य उस्मानाबाद संपर्क प्रमुख परवेज मुल्ला, तालुका कार्याध्यक्ष अमोल मोरे, जलमंदिर प्रतिष्ठान चे विशाल भोरे, सानी कांबळे, मयूर लोखंडे,वैरागे, उमेश देडे, अक्षय रणदिवे, सचिन कुचेकर, प्रबुद्ध गायकवाड, निखिल गायकवाड, मयूर कांबळे, मुन्ना कांबळे, सोनू कसबे,अमोल राऊत , अनिल कसबे, इम्रान बागवान, सोमनाथ भाऊ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष उमेश (भैय्या) देडे, अक्षय रणदिवे, अविनाश वैरागे, सतिष ताटे पांडुरंग तात्या कदम लहुजी शक्ति सेना कळंब तालुका प्रमुख, विकास गायकवाड, बालाजी गायकवाड, लहुजी शक्ति सेना जिल्हा कोरकमिटी अध्यक्ष, विठ्ठल ताटे, बापु कसबे, सिकंदर वैरागे, सुनिल देडे, कुंदन कदम, आनंद कदम, धनेश ताटे, अजय वैरागे, महेश ताटे, आकाश ताटे, प्रणव गायकवाड, सुरज कदम, आमोल कसबे, आमोल ताटे,विकास रणदिवे, संदिप कदम,साई कांबळे, ऩेहाल गायकवाड बालाजि कसबे, तानाजी वैरागे, आजय डिकुळे,आप्पा गायकवाड, अक्षय पेठे, शंकर ताटे, आदि उपस्थित होते.

यावेळी या शिबिरास उस्मानाबाद कळंबचे आ. कैलास पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख शिवाजी आप्पा कापसे, शहराध्यक्ष प्रदिप मेटे, सागर बाराते, संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र समन्वयक अतुल गायकवाड, जिल्हाअध्यक्ष अॅड. तानाजी चौधरी आदींनी भेट देऊन रक्तदात्यांना श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य चे प्रमाण पत्र व शुभेच्छा दिल्या.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.