Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टचा आळंदी येथे राष्ट्रीय सुवर्ण सामाजिक संस्था म्हणून गौरव..!

Spread the love

पुणे (आळंदी) |  काल पुण्यामध्ये माउलींच्या पावनभूमीत आळंदी येथ आरंभ प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या वतीने श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टच्या 3 वर्षातील कामाची दखल घेऊन राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय सुवर्ण सामाजिक संस्था म्हणून सन्मानपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.

श्री शिवशंभु चॅरिटेबल ट्रस्ट हे नाव ऐकल की विचार येतो तो रक्तदान मोहिमेचा, मागील 3 वर्षांपासून रक्तदान क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणे काम करून युवकांची रक्तदानासाठी चळवळ उभी करण्याच्या माध्यमातून शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्रभर कार्यरत आहे व हि संकल्पना यशस्वी होत आहे, महाराष्ट्रामध्ये रक्तदानामध्ये शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टचे नाव अग्रस्थनी आहे यासर्व पदाधिकारी आणि युवकांच्या पाठिंब्यामुळे शक्य असल्याचे संस्थेकडून वेळोवेळी सांगण्यात येते. अनेक संस्था, प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून आजपर्यंत शिवशंभू ट्रस्ट कमिटीच्या कामाची दखल घेऊन अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.


आजपर्यंत ज्या ज्या लोकांनी ट्रस्टवरती विश्वास ठेऊन रक्तदान केले आहे अश्या लोकांची संख्याही खूप मोठी आहे, त्यामुळे 1 लाख रक्तदात्यांची चळवळ उभी करण्याचे ट्रस्टचे ध्येय आहे असे यावेळी संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष शिवश्री भूषण सुर्वे यांनी सांगितले.


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुण्यनगरीचे माझी उपमहापौर मा कैलास बांबूर्डे, आरंभ प्रतिष्ठानचे संस्थापक संतोषजी टाक, उपाध्यक्ष सारिका नांगरे यांच्या हस्ते हा पुरस्कार आळंदी देवाची येथे देण्यात आला. यावेळी शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट कमिटीकडून संस्थापक अध्यक्ष शिवश्री भूषण सुर्वे, बारामती तालुका कार्याध्यक्ष माउली खाडे, पुणे शहर कार्याध्यक्ष राहुल भोसले व करमाळा तालुका अध्यक्ष अंगद भांडवलकर उपस्थित होते.

Exit mobile version