इंदापूर तालुक्यात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मिळवून देण्यास, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाने घेतला पुढाकार!

Spread the love

भिगवण | शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आजपर्यंत गोरगरीब रुग्णांपर्यंत पोहचता आले अर्थीक मदत सोडून सर्व प्रकारच्या मदतीसाठी आम्ही पुढे आलो, प्रामुख्याने रक्तदान क्षेत्रामध्ये. परंतु नशिबाने शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची म्हणजेच मंत्रीमहोदय मा. एकनाथजी शिंदे साहेब व डॉ श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि वैद्यकीय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख व आमचे मार्गदर्शक मा मंगेशजी चिवटे साहेब व आमचे पुणे जिल्हयाचे संपर्क प्रमुख मार्गदर्शक मा राजभाऊ भिलारे यांनी माझ्यावरती विश्वास ठेऊन शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष *पुणे उपजिल्हा समन्वयक* हि जबाबदारी दिली असे भूषण सुर्वे यांनी यावेळी सांगितले.

इंदापूर तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने आज कामाला सुरुवात झाली, आज पद घेतल्यानंतर लगेचच भिगवण मधील पेशंटला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमधून 25,000 रू त्यांच्या खात्यावर्ती जमा झाले..यामध्ये सर्वात जास्त मोलाचे सहकार्य लाभले धाराशिव जिल्ह्याचे व समन्वयक ऍड कानिफ कानतोडे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.

जे राजकारणाच्या दृष्टीने बघतात त्यांना एकच सांगणे आहे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष हे प्रामाणिकपणे आणि विश्वासाला सार्थ राहून फक्त आणि फक्त हॉस्पिटलच्या मदतीसाठी कार्यरत आहे आणि राहील…असेही सुर्वे यांनी सांगितले.
व कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे सर सर आणि राजाभाऊ भिलारे यांचेही यावेळी आभार मानले. व मदत मिळवन्यासाठी व माहितीसाठी खालील नंबर वरती संपर्क करण्याचे आव्हान देखील सुर्वे यांनी यावेळी केले.

मो: 969696 0331

www.shivsenamedicalhelpline.org

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.