पुण्यातील जम्बो कोविड केअर सेंटरच्या सुविधा फक्त कागदावरचं; शरद पवारांनी केली पोलखोल?
पुणे | पुण्यातील जम्बो कोविड केअर सेंटर मध्ये कसे उपचार दिले जातात याप्रकरणी शरद पवारांनी प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांचे कान टोचले, व पोलखोल देखील केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज अचानक पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कोरोना वॉर रुमला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. शरद पवारांना महानगरपालिकेमध्ये येऊन कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. गेल्या काही दिवसांत शहरात रोज एक हजारांहून अधिक कोरोना संक्रमित रुग्ण आढळू लागले आहेत. तर रोज मृतांचा आकडाही वाढू लागला आहे. ही आकडेवारी कशी आवाक्यात आणता येईल याबाबतची पवारांकडून काही सूचना देखील महापालिका आयुक्त आणि पदाधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप आणि महापालिका आयुक्त हे वायसीएम रुग्णालयात कसे योग्य उपचार दिले जात आहेत, याची हुशारकी मारत असताना शरद पवारांनी सर्वांचे कान देखील टोचले.
पिंपरी-चिंचवड येथील वाढत्या कोविड रुग्णसंख्येची कारणमीमांसा जाणून घेण्यासाठी तेथील मनपा कार्यालयातील डिझॅस्टर मॅनेजमेंट वॉररुमला भेट देऊन आयुक्तांकडून सविस्तर आढावा घेतला. गरीब रुग्णांसाठी ५० #remdesivir इंजेक्शन्सही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे याप्रसंगी सुपूर्द केली. pic.twitter.com/q3ocMyf76y
— Sharad Pawar (@PawarSpeaks) September 3, 2020
पुण्यात वेळेत सुविधा उपलब्ध न झाल्याने काल ‘टीव्ही 9 मराठी’चे पुण्याचे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांचा मृत्यू झाला. या घटनेकडे पवारांनी बोट दाखवलं आणि पिंपरी मधील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये नेमकं कसे उपचार दिले जात आहेत, हा महत्वाचा प्रश्न असल्याचं शरद पवारांनी म्हटलं. “तुम्ही पाहताय पुण्यातील माध्यम प्रतिनिधीचा मृत्यू झाला. पत्रकार असो की सामान्य यात अनेक बिचाऱ्यांचे मृत्यू होत आहेत. कोरोनासाठी स्वतंत्र व्यवस्था करुनही अनेक बाबी समोर येत आहेत”, असं शरद पवार म्हणाले “डॉक्टर्स नाही, नर्स नाही, वेळेवर औषध नाही अशा तक्रारी येत आहेत”, अशी खंत ही पवारांनी व्यक्त केली. काही अति करतात, पण असं घडता कामा नये, अशी सूचनाही पवारांनी यावेळी दिली.