Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

महाराष्ट्राचे तडफदार नेतृत्व शरद पवार यांची 79 व्या वयात कोरोना टेस्ट निगेटिव्ह!

Spread the love

मुंबई | सिल्व्हर ओक या निवासस्थानी दोन सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची कोरोना चाचणी करण्यात आली असून तिचा अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी असलेल्या दोन सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हे दोघेही पवार यांच्या सुरक्षा ताफ्यातील रक्षक आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या सुरक्षा ताफ्यातील सहा रक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात दोन जणांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर सिल्व्हर ओक येथील अन्य कर्मचाऱ्यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यांचा अहवाल अद्याप आलेला नाही. काल पवार पुण्यात होते. रात्री ते मुंबईला परतले आहेत. मात्र, ज्या दोन सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे, त्यापैकी कुणीही पवार यांच्या संपर्कात आले नव्हते, अशी माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, सिल्व्हर ओक येथील सुरक्षा रक्षकांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती टोपे यांनी दिली. त्यानंतर शरद पवार यांची ब्रिच कँडी रुग्णालयात तपासणी करण्यात आली असून त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे टोपे यांनी सांगितले. मात्र शरद पवार राज्यभर दौरे करत असून त्यांना आपण न फिरण्याची विनंती करणार आहोत, असेही टोपे यांनी स्पष्ट केले. कोरोना लशीची मानवी चाचणी आक्सफर्ड व सिरम इन्स्टिट्युटमध्ये सुरु असून येत्या दोन महिन्यांच कोरोनाची लस उपलब्ध होईल, अशी शक्यता टोपे यांनी वर्तवली आहे.

Exit mobile version