विद्या प्रतिष्ठान इंग्रजी माध्यमिक शाळा सी.बी.एस.ई बारामती चे दहावीत उज्ज्वल यश

Spread the love

बारामती | ता.१६ – विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या इंग्रजी माध्यमिक शाळाचा दहावीचा सीबीएसई बोर्डाचा निकाल १०० टक्के लागला.
तसेच शाळेमधील
१६ विद्यार्थ्यांना ९५ टक्क्यांहून अधिक गुण मिळाले .
५२ विद्यार्थ्यांना ९० ते ९४ टक्के गुण मिळाले .
४४ विद्यार्थ्यांना ८० ते ८९ टक्के गुण मिळाले .
४३ विद्यार्थ्यांना ७० ते ७८टक्के गुण मिळाले .
२० विद्यार्थ्यांना ६० ते ६९ टक्के गुण मिळाले .
०८ विद्यार्थ्यांना ५०ते ५९ टक्के गुण मिळाले .

यामध्ये  कु.भक्ती सांगवीकर या विद्यार्थिनीने ९७.५० टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला.
कु.मुक्ता वेदपाठक या विद्यार्थिनीने ९७.१७ टक्के गुण मिळवून शाळेत द्वितीय क्रमांक पटकावला.
कु.विणा मधुरे व कु.रुचा शिंद या दोन्हीही विद्यार्थिनीने ९७.०० टक्के गुण मिळवून शाळेत तृतीय क्रमांक पटकावला आहे .
त्यांना संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष श्री. शरदचंद्रजी पवार व उपाध्यक्ष अ‍ॅड.अशोक प्रभुणे आणि संस्थेचे सर्व सभासदांचे प्रोत्साहन लाभेले.

तर प्राचार्या सौ.राधा कोरे व विशेष शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.आणि प्राचार्या सौ.राधा कोरे यांनी शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.