पुण्यात पुन्हा एकदा तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध कायम, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती!

Spread the love

पुणे |  पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची नुकतीच पत्रकार परिषद पार पडली आहे. यावेळी त्यांनी पुण्यातील निर्बंधावरील माहिती दिली आहे. येत्या आठवड्यातही पुण्यात तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू असतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. पुण्याचा दर मागच्या तुलनेत वाढत असल्याचं म्हणत 4.6 पॉझिटिव्हिटी रेट होता आता 5.3 झाला आहे. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील नियमावली सुरू ठेवायचा निर्णय घेण्यात आला असल्याचं अजित पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.

मॉल सुरू करावे का असा विचार होता. पण सेंट्रल एसीमुळे अधिकारी मॉल सुरु करण्यास नकार देत असल्याचंही त्यांनी सांगितलं. दुसऱ्या लाटेत लागलेल्या ऑक्सिजन पेक्षा तिप्पट ऑक्सिजन तयार करायची क्षमता तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसंच वैद्यकीय महाविद्यालयामध्ये क्लासेस सुरू करणार पण विद्यार्थी आणि डॉक्टर यांच्या दोन्ही लसीकरण केलेलं पाहिजे, असंही अजित पवारांनी म्हटलं आहे. लसीकरण झालं असेल तर 18 वर्षापुढील खेळाडूंना इनडोर गेमला परवानगी देत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

काय आहेत तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध

  • अत्यावश्यक सेवेतील दुकाने सोडून सर्व दुकाने 4 पर्यंत खुली राहणार आहे. यात मॉल्स हे पूर्णपणे बंद राहणार आहे.
  • तर हॉटेल्सही 4 वाजेपर्यंत खुली राहणार आहे.

पुण्यात काय राहणार सुरू, काय बंद?

  • पुणे महापालिका क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवा अंतर्गत दुकाने आठवड्यात सर्व दुकाने दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहणार
  • अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार 4 वाजेपर्यंत सुरू तर शनिवार रविवार पुर्णपणे बंद
  • मॉल्स, सिनेमागृहं संपूर्ण बंद.
  • रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत आसनक्षमतेच्या 50% क्षमतेने आणि शनिवाररविवार फक्त पार्सल सेवा 11 पर्यंत.
  • खाजगी कार्यालयं कामाच्या दिवशी 50% क्षमतेने दुपारी 4 वाजेपर्यंत
  • अत्यावश्यक सेवा संबंधी शासकीय कार्यालयं 100% क्षमतेने
  • उद्याने, मैदाने, जॉजींग, रनींग आठवड्यील सर्व दिवस पहाटे 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत.
  • अत्यावश्यक सेवा संबंधी शासकीय कार्यालयं 100% क्षमतेने
Google Ad

5 thoughts on “पुण्यात पुन्हा एकदा तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध कायम, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती!

Leave a Reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.