“एक राजा तर बिनडोक; दुसरे संभाजीराजे आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवर भर देत आहेत – प्रकाश आंबेडकरांनी केली सडकून टीका!

Spread the love

मुंबई |  मराठा आरक्षणाला पाठिंबा जाहीर करताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजप खासदार उदयनराजे भोसले तसेच युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्यावरती सडकून टीका केली.

“एक राजा तर बिनडोक आहे, असं मी म्हणेन, आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर सगळ्यांचं आरक्षण रद्द करा असं म्हणतात’ अशा शब्दात प्रकाश आंबेडकर उदयनराजेंवर बरसले. तर संभाजीराजे आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवर भर देत आहेत, अशी टीका त्यांनी केली.
‘एक राजा तर बिनडोक आहे. दुसरे संभाजीराजे आहेत, त्यांनी भूमिका घेतली हे बरोबर आहे. पण ते आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवर भर देत आहेत, असं मला दिसतंय’ असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

तुम्ही उदयनराजेंना अंगावर घेताय का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता ‘मी अंगावर घ्यायला कोणालाच भ्यायलेलो नाही. ज्या माणसाला घटना मिळत नाही. आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर सगळ्यांचं आरक्षण रद्द करा, असे म्हणतात. भाजपने राज्यसभेत कसं पाठवलं तेच कळत नाही’ असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी आश्चर्य व्यक्त केलं.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.