Post Office मध्ये देखील मिळेल सुरक्षा विमा, 50 लाखांपर्यंत कव्हरेज आणि कर्जाच्या सुविधेसह आहेत हे फायदे!

Spread the love

नवी दिल्ली |  एक सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून पोस्ट ऑफिसमधील विविध योजनांकडे पाहिलं जातं. यामध्ये जोखीम कमी असते आणि सरकारी गॅरंटी देखील मिळते. पोस्टाच्या विविध छोट्या बचत योजनांमध्ये  पैसे गुंतवणं ग्राहक पसंत करतात. दरम्यान याशिवाय पोस्ट ऑफिसकडून वीमा योजना देखील ऑफर केली जात आहे. पोस्टल लाइफ इन्शुरन्स अर्थात डाक जीवन वीमा देण्यात येतो आहे. याचे विविध फायदे तुम्हाला मिळू शकतात. विशेष म्हणजे तुम्ही याअंतर्गत 50 लाखापर्यंत कव्हरेज मिळवू शकता. वाचा नेमके काय फायदे आहेत

पोस्ट ऑफिसमध्ये दोन कॅटेगरीअंतर्गत वीमा सुरक्षा दिली जाते- PLI आणि RPLI. दरम्यान PLI अंतर्गत 6 पॉलिसी मिळतात. यामध्ये एक Whole life insurance (सुरक्षा) ही पॉलिसी देखील प्रदान केली जाते.

-कमीतकमी सम अश्योर्ड: 20000 रुपये

-जास्तीत सम अश्योर्ड: 50 लाख रुपये

-सुरुवातीला हा विमा केवळ सरकारी आणि निम्न सरकारी कर्मचाऱ्यांसाठी होता. आता हा इन्शुरन्स डॉक्टर, इंजीनिअर, मॅनेजमेंट कंसल्टंट, चार्टर्ड अकाउंटंट, आर्किटेक्ट, वकील, बँकर्स आणि कर्मचारी यांकरता शिवाय, NSE आणि BSE लिस्टेड कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना देखील मिळतो.

*PLI होल लाइफ इन्शुरन्स पॉलिसी काढण्यासाठी अर्जदाराचं वय कमीतकमी 19 आणि जास्तीत जास्त 55 असणं आवश्यक आहे.

*https://pli.indiapost.gov.in या वेबसाइटवर जाऊन तुम्ही ऑनलाइन विमा काढू शकता.

Whole life insurance अंतर्गत काय फायदे मिळतील?

*तुम्हाला कर्जाची सुविधा मिळेल

*पॉलिसीची चार वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ही कर्जाची सुविधा मिळेल

*तुम्हाला जर पॉलिसी बंद करायची असेल तर तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर सरेंडर करण्याचा पर्याय देखील उपलब्ध आहे.

*इन्शुरन्स काढणाऱ्या व्यक्तीला बोनससह 80 वर्ष वयात एक अश्योर्ड अमाउंट देखील मिळते

*याआधी विमाधारकाचा मृत्यू झाल्यास ही रक्कम नॉमिनीला दिली जाते

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.