Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

कोरोनाला रोखण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी; वाचा सविस्तर!

मुंबई | मुंबईत कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी दिवस-रात्र प्रशासनश र्तीचे प्रयत्न करत आहेत. हे प्रयत्न करताना अत्यावश्यक सेवेतील खास करून नागरिकांच्या वारंवार संपर्कात आलेल्या पोलिसांमध्ये कोरोना पसरण्याचा प्रादुर्भाव सर्वाधिक आहे. पोलिसांमधील कोरोनाचे हे वाढते प्रमाण रोखण्यासाठी आता मुंबई पोलिस दलातील 94 पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या 45 ते 55 वयोगटातील पोलिसांची ‘रॅपिड अँटीजेन डिटेक्शन टेस्ट’ केली जाणार आहे.

देशभरात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी चाचण्यांचा वेग वाढवण्यात आला आहे. पण करोनाची चाचणी केल्यानंतर अहवाल येण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नव्हते. काही वेळा चाचणीचा रिपोर्ट येण्याआधीच रुग्णाचे निधन झाल्याचे प्रकार घडले आहेत. ते टाळण्यासाठी ‘इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ने काही दिवसांपूर्वी रॅपिड अँटिजेन डिटेक्शन टेस्टला मंजुरी दिली. या चाचणीमुळे आता जलदगतीने करोना चाचणीचा रिपोर्ट मिळणे शक्य होत असून रुग्णाला वेळीच उपचारही मिळणार आहे.

महाराष्ट्र पोलिस दलात आज 1773 कोरोनाचे रुग्ण आहेत. त्यात 204 अधिकारी आणि 1569 पोलिस कर्मचायांचा समावेश आहे. तर राज्यात 90 पोलिस कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यात मुंबई पोलिस दलातील पोलिस कर्मचाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. वेळीत या संसर्गाला आवरले नाही. तर परिस्थिती हाताबाहेर जाईल म्हणूनच मुंबई पोलिस दलात 24 जुलै ते 29 जुलै या कालावधीत मुंबई प्रादेशिक विभागातील परिमंडळानुसार ‘रॅपिड अँटीजेन डिटेक्शन टेस्ट’ची टेस्ट केली जाणार आहे.

Exit mobile version