ऑक्सफर्ड विद्यापीठाला कोरोना लशीच्या चाचणी मध्ये मोठ यश…कोरोनाची लस अंतिम टप्प्यात!
ऑक्सफर्ड विद्यापीठा मध्ये चालू असलेल्या संशोधना मध्ये मोठ यश आल आहे या लशीची चाचणी १,०७७ स्वयंसेवकांवर इंजेक्शनद्वारे घेण्यात आली. लस देण्यात आल्यानंतर व्यक्तींच्या शरीरात अँटिबॉडीज तयार होत असल्याचं तसंच कोरोना विषाणू विरोधात लढण्यासाठी शरीरात पांढऱ्या पेशी तयार होत असल्याचं स्पष्ट होत आहे.
या चाचण्यांचे निष्कर्ष सकारात्मक आहेत मात्र कोरोना विषाणूचं शरीरातून पूर्ण पणे उच्चाटन करण्यासाठी ही लस सर्वसमावेशक दृष्ट्या उत्कृष्ट आहे का हे आताच सांगणं कठीण आहे.
लशीची परिणामकारकता अभ्यासण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर चाचण्या घेतल्या जात आहेत. युकेने ऑक्सफर्ड विद्यापीठाकडे लसीचे १०० दशलक्ष डोस पुरवण्याची मागणी केली आहे.
लस तयार व्हायला मात्र वर्षभराचा अवधी लागू शकतो असतं जागतिक आरोग्य संघटना चं म्हणणं आहे. पण लस बाजारात सप्टेंबर महिन्याच्या शेवटी पर्यन्त येऊ शकते.
ऑक्सफर्ड विद्यापीठात सुरू असलेल्या प्रयोगाला युकेच्या सरकारनेही पाठिंबा दिला आहे. सर्वात जास्त महत्त्वाच म्हणजे हि लस आपल्या पुण्यात तयार होणार आहे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या कंपनीने या लसीच उत्पादन घेतल आहे यामुळे याचा फायदा नक्कीच आपल्या देशाला व महाराष्ट्राला होणार आहे
ऑक्सफर्ड विद्यापीठाची लस काम कशी करेल?
शास्त्रज्ञांनी कोरोना व्हायरसच्या वरील भागावर असलेल्या टोकदार भागातली गुणसूत्रं काढून ती दुसऱ्या निरुपद्रवी विषाणूमध्ये सोडली आहेत. यातून ही लस तयार होतेय. ही लस शरीरात टोचली की ती पेशींमध्ये जाते. आणि मग शरीरात कोरोना व्हायरसच्या स्पाईक प्रोटिनची निर्मिती सुरू होते.
या प्रक्रियेत शरीरातली प्रतिकारशक्ती वाढते आणि मग रुग्णाच्या शरीरात अँडीबॉडीजची निर्मिती सुरू होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या प्रक्रियेदरम्यान T सेलही कार्यरत होतात. थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्या शरीरातल्या पेशी कोरोना व्हायरसला ओळखतात आणि मग त्या कोरोना विषाणू ला पूर्ण पणे संपवतात