दौंड तालुक्यातील यवतमध्ये रक्तदानाचा नवा विक्रम; ७७० रक्ताच्या बॅगेचे रक्तसंकलन, शिवशंभू ट्रस्टचे विशेष सहकार्य!

दौंड (पुणे) – आज पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत जवळ असणाऱ्या राहू गावमध्ये रक्तदानाचा नवा विक्रम करण्यात आला. कारणही तसेच होते. पुणे जिल्ह्यातील नावजलेले नाव स्व. संतोषभाऊ जगताप (पाटील) यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचे.
स्व. संतोषभाऊ जगताप (पाटिल) यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचे औचित्य साधून श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट आणि स्व. संतोषभाऊ जगताप युवा मंच दौंड तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने राहू येथील लक्ष्मी लॉन्स येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, सकाळी ८ वाजल्यापासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत भाऊंच्या असंख्य मित्र परिवाराने भाऊंच्या समरणार्थ नवा विक्रम नोंदविला आहे. अनेक सामाजिक कार्यातील तसेच राजकिय व्यक्तिनी यामध्ये सहभाग नोंदवून रक्तदान हेच श्रेष्ठदान हा संदेश दिला.
कार्यक्रमाचे आयोजन त्यांचे मोठे भाऊ समीर जगताप आणि स्वप्निल जगताप यांनी केले होते, यावेळी शिवशंभू ट्रस्टचे विशाल धुमाळ, भूषण सुर्वे, राहुल ढवळे यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी प्रतेक रक्तदात्याला प्रोत्सनपर आणि भाऊंच्या स्मरणार्थ सन्मानचिन्ह भेट देण्यात आले.