कोरोनालस जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचविण्यासाठी मोदी सरकार करणार आहे हा प्लॅन!

मुंबई | जगभरात कोरोना विषाणूंमुळे थैमान सुरू आहे. हा संसर्ग थांबवण्यासाठी वेगवेगळ्या देशांमध्ये 140 लशींवर काम सुरू आहे. त्यापैकी 23 लशींच्या क्लिनिकल चाचण्या सुरू आहेत. कोवॅक्सिनची चाचणी दुसऱ्या तर ऑक्सफोर्ड युनिवर्सिटीनं तयार केलेल्या लशीची चाचणी तिसऱ्या टप्प्यात सुरू आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत किंवा पुढच्या वर्षाच्या सुरूवातीला ही लस जगभरात उपलब्ध होऊ शकेल असा कयास आहे. 130 कोटी लोकसंख्या असलेल्या भारतासारख्या देशात प्रत्येक व्यक्तीपर्यंत ही लस पोहोचणं तसं कठीण आणि त्यासाठी खूप जास्त वेळ लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यासगळ्याचा विचार करून केंद्र सरकारनं देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत ही लस पोहोचवण्यासाठी काही योजना आखण्यास सुरुवात केली आहे. मीडिया अहवालानुसार सरकार अनेक एजन्सीशी यासंदर्भात वेगवेगळ्या स्तरांवर चर्चा करत आहे.
कोरोनाची लस ठेवण्यासाठी सर्वात मोठं कोल्ड स्टोअरेज आपल्याला लागणार आहे. याची तयारीही आणि नियोजन सरकारकडून सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. उत्तर पूर्व भारत असो किंवा अगदी ग्रामीण भाग तिथपर्यंत ही लस पोहोचवणं आव्हान असल्यानं त्यासाठी सरकारकडून नियोजन आणि कामाची आखणी सुरू आहे.