नरेंद्र मोदी सलग दुसऱ्या वर्षी लाल किल्ल्यावर फडकविणार तिरंगा; होणार नवीन विक्रम!

Spread the love

दिल्ली| पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १५ ऑगस्टला (शनिवारी) लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकावतील तेव्हा सलग सातव्यांदा तो मान मिळविणारे ते पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान ठरतील. पंडित जवाहरलाल नेहरू यांना स्वातंत्र्यानंतरची सर्वाधिक तब्बल १७ वर्षे हा मान मिळाला आहे. त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी (६ वर्षे), इंदिरा गांधी (११ वर्षे) व डॉ. मनमोहनसिंग (सलग १० वर्षे) यांनी लाल किल्ल्यावरून देशाला स्वातंत्र्यदिनी संबोधित केले होते.

नरेंद्र मोदी यांच्या नतृत्वाखालील भाजपने २०१९ मध्ये सलग दुसऱ्यांदा काँग्रेस आघाडीला धूळ चारून लोकसभेत घवघवीत बहुमत मिळविले. त्यानंतर दुसऱ्या वर्षी मोदी यंदा लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकावतील. यंदाचा स्वातंत्र्यदिन कोरोना महामारीच्या छायेत होत असल्याने याकार्यक्रमावर मर्यादा असल्या तरी डिजीटल माध्यमाद्वारे पंतप्रधानांचे भाषण पाकिस्तान व चीनसह देशभरात तत्काळ पोहोचणार आहे. मागील वर्षी मोदींनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या विक्रमाशी बरोबरी केली होती. यंदा ते स्वतःच विक्रम प्रस्थापित करतील आणि भाजपने हा सोहळा जंगी स्वरूपात साजरा करण्याचे नियोजन केले आहे. अटलबिहारी वाजपेयी १९९६ मध्येही पंतप्रधान झाले होते. मात्र स्वातंत्र्यदिन येण्यापूर्वीच त्यांचे सरकार कोसळल्याने त्यांना त्या वर्षी तो मान मिळाला नव्हता. त्यानंतर १९९९ ते २००३ या काळात त्यांनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला होता. दरम्यान, लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकावणारे पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान सत्तेवर येण्यास देशात १९७७ साल उजाडले. इंदिरा गांधीचा पराभव करून सत्तेवर आलेल्या जनता सरकारचे पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी तो १९७७-७८ या वर्षी मान मिळविला होता.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.