इंदापूर | इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी या एका छोट्या गावामध्ये शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये रक्तदान चळवळ यशस्वीपणे उभारून सामाजिक कार्यात आपला ठसा उमटवणारे भूषण सुर्वे हे कमी कालावधीमध्ये तत्कालीन शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांचे विश्वासू बनले व मंगेश यांनी सुद्धा भूषण सूर्य यांच्या वरती विश्वास ठेवून पुणे जिल्हा वरती काम करण्याची संधी दिली आणि त्यात संधीला पात्र ठरत भूषण सुर्वे यांनी त्यांच्यासोबत काम करताना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मधून दीड वर्षांमध्ये ६० लाखांपेक्षा जास्त निधी व २५० पेक्षा जास्त रुग्णांना मदत मिळवून दिले.
त्यानंतर लोकसभेच्या रणधुमाळी मध्ये वैद्यकीय मदत पक्षाची गरज पाहता खा सुप्रिया सुळे यांनी सुद्धा शरदचंद्र पवार वैद्यकीय मदत कक्षाची संकल्पना डोळ्यासमोर ठेवून भूषण सुर्वे यांच्याकडे ही जबाबदारी दिली तिथेही भूषण सुर्वे यांच्या माध्यमातून ३१ लाखांपेक्षा जास्त निधी मुख्यमंत्री सहायता निधी मधून रुग्णांना मिळवून देण्यामध्ये ते यशस्वी झाले. व निवडणूक होताच भूषण सुर्वे यांनी पुन्हा एकदा स्वतःचे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील गुरुवर्य मंगेशजी चिवटे यांच्यासोबत जाण्याचे ठरवले, व त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, खा. श्रीकांत शिंदे व शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा सचिव संजयजी मशीलकर यांच्या हस्ते पक्ष प्रवेश केला, सोबत पुणे जिल्हाचे जिल्हाप्रमुख महेश पासलकर व सुरेंद्र जेवरे यावेळी उपस्थित होते
आजपर्यंत महाराष्ट्राला लाभलेले यशस्वी मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांच्या कामाचा वेग आणि कामाची पद्धत पाहता पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत काम करण्याची तळमळ आणि इच्छा असल्यामुळे तसेच मंगेश चिवटे हे माझे गुरुवर्य असल्यामुळे मला त्यांच्यासोबत पुन्हा काम करण्यास आवडेल म्हणून मी हा निर्णय घेतला आहे असे भूषण सुर्वे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.